Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अभिनेता सोनू सूदवर सोपवली ‘ही’ महत्वाची कामगिरी

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अभिनेता सोनू सूदवर सोपवली ‘ही’ महत्वाची कामगिरी

जगभरात कोरोना विषाणूचा धोका अधिक गंभीर होताना दिसत आहे. जेव्हा २०२० वर्ष संपले तेव्हा, लोकांना वाटले की आता कोरोना संपेल. कोरोना संसर्गाची प्रकरणेही पूर्वीच्या तुलनेत फारच कमी झाली होती. पण आता कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेला वेग आला आहे, आणि देशात त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात कोरोनाची वाईट परिस्थिती होती, परंतु आता देशातील बर्‍याच राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. पंजाब राज्यात कोरोना लसीकरणासाठी आग्रह करू लागला आहे. या कार्यासाठी, पंजाबने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

सोनू सूद याची भेट घेतल्यानंतर, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याची घोषणा केली. त्यांनी सोनू सूदला त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले, “सोनू सूद याच्यासारखा दुसरा आदर्श कोणी असू शकत नाही, जो लोकांना कोरोना लस घेण्यास प्रेरित करू शकतो.” पंजाबमध्ये कोरोना लस घेण्याबद्दल लोकांमध्ये बरीच शंका आणि भीती आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, “सोनू सूदने गेल्या वर्षी ज्या प्रकारे प्रवासींना मदत केली, आणि जनतेचा त्याच्यावर ज्या प्रकारचा विश्वास आहे, त्यावरून हे निश्चितच सिद्ध झाले आहे की, जेव्हा पंजाबचा हा मुलगा लोकांना लसीचे फायदे आणि त्याच्या गुणवत्तेबद्दल सांगेल, तेव्हा लोक नक्कीच सहमत होतील. कारण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे.

अभिनेता सोनू सूदसुद्धा ही नवी जबाबदारी पार पाडल्याने खूप आनंदी झाला आहे. तो म्हणाला, “या मोठ्या मोहिमेमध्ये कोणतीही भूमिका निभावून आणि माझ्या गृह राज्यातील लोकांचे प्राण वाचवून मी धन्य होईन.” या भेटीत सोनू सूद यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना “आई एम नो मसीहा” हे पुस्तक भेट केले आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा