बिग बॉस मराठीच्या घरात अनेक राडे होताना दिसत आहेत. घरात टास्क खेळताना अनेक वादविवाद होत आहेत. सदस्यांचा एकमताने निर्णय देखील होत नाहीये. तसेच हल्लाबोल टास्कनंतर घरात दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता हल्लाबोल टास्कची खुन्नस काढत सदस्य एकमेकांना नडताना दिसत आहे. हल्लाबोल टास्कमध्ये टीम ए विजयी झाल्याने या टीममधील गायत्री आणि जय हे बहुमताने कॅप्टनशीप टास्कसाठी सिलेक्ट झाले आहेत. तसेच कॅप्टन्सी टास्क या दोघांमध्ये खेळला गेला आहे. (next week’s captain task is cancel in bigg boss marathi 3)
नुकतेच बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. या टास्कचे नाव ‘खुल जा सिम सिम’ असे होते. यावेळी बिग बॉसने एक पासवर्ड दिला होता. त्या पासवर्डचे अंक गार्डन एरियामध्ये ठेवलेले असतात. तेव्हा घरातील इतर सदस्यांनी सगळे अंक घ्यायचे आणि पासवर्डनुसार दोन स्पर्धकांनी म्हणजेच गायत्री आणि जयने इतर सदस्यांना ते कशाप्रकारे चांगला कॅप्टन होऊ शकतात हे पटवून देऊन तो पासवर्ड मिळवायचा आहे. या टास्कचा संचालक विकास पाटील हा होता. यावेळी टास्क दरम्यान मोठ्या प्रमाणात भांडण झाल्याचे दिसून आले आहे.
यावेळी या टास्कच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या, पण तिन्ही फेरीत एकही स्पर्धक पूर्ण पासवर्ड मिळवण्यास यशस्वी होत नाही. दुसऱ्या फेरीत जय त्याला मिळणारे अंक गायत्रीला देतो पण संचालक हा निर्णय अमान्य करतात आणि ही फेरी रद्द करतात. पण तिन्हीही फेऱ्या अयशस्वी झाल्याने बिग बॉसने हा टास्क रद्द केला आणि या आठवड्यात कोणीच कॅप्टन असणार नाही असे घोषित केले. त्यामुळे आता या आठवड्यात कोणते काम कोण करणार याबाबत खूपच वाद चालू आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या आठवड्यात बिना कॅप्टनचे घर कसे असणार आहे, तसेच घरातील सदस्य कसे वागणार आहेत हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ
-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा
-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद