टीव्ही वरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा कायमच तिच्या अभिनयाने आणि मादक लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. साल २०१० मध्ये तिने अभिनयात पदार्पण केले. ‘काली,एक अग्नी परीक्षा’ ही तिची पहिली मालिका होती. त्यानंतर ती अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली. ‘एक हजारो मे मेरी बहाना है’ या मालिकेमधून ती घराघरात पोहचली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला चाहत्यांनी चांगलीच पसंती मिळाली.
निया तिच्या अभिनयासह हटके आणि बोल्ड लूकमुळे देखील खूप चर्चेत असते. आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे वेगवेगळे लूक पाहण्यासाठी चाहते देखील तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. निया एक उत्तम अभिनेत्रीसोबत उत्तम डान्सर देखील आहे. नियाचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. तिचे हे गाणं सोशल मीडियावर सध्या चांगलच चर्चेत आले आहे. तिने या गाण्याचा एक छोटा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
नियाने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काळ्या कॉफीचे दोन घोट मला खूप जागवतात”. तिच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच हंगामा केला आहे. सगळीकडे तिच्या या गाण्याचीच चर्चा सुरु आहे. या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यने केली असून, श्रुती राणेने या गाण्याला आवाज दिला आहे.
व्हिडीओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले असून, नाकामध्ये मोठी नथ तिचे सौंदर्य अधिकच वाढवत आहे, आणि तिला आकर्षक बनवत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘दो घूट मुझे भी पिलादे’ हे गाणे सुरु आहे. तिच्या या व्हिडिओ चाहते भन्नाट कमेंट करत आहेत. अनेकांनी तिला प्रतिक्रिया देताना हार्ट आणि फायर इमोजी पाठवले आहेत.
निया सोशल मीडियावरील सक्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. ती सतत तिचे अतिशय बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. यामुळे ती अनेकदा ट्रोल देखील होते. मात्र ट्रोलिंगकडे साफ दुर्लक्ष करत ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील देते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा