Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘एकही रुपया कमावला नाही’, निया शर्माने सांगितला तिचा संघर्षमय प्रवास

कोणताही व्यक्ती जेवढा जास्त यशस्वी होतो तेवढेच त्याने संघर्ष  केलेले असतात. जर फिल्मी दुनिेएत आपली एक नवीन ओळख निर्माण करुन दाखवने म्हणजे फारच कठीण असते मग ते बॉलिवूड असो किंवा टीव्ही दुनियेतील छोटा पडदा, नेपोटिझममुळे काम मिळवणे फारच कठिण असते. अशा परिस्थितून पुढे जाणे खूपच कमी लोक आहेत जे यामध्ये जीवतोड मेहनत करुन यशस्वी ठरतात. त्यांच्यापैकीच एक टीव्ही सिरियलमधील अभीनेत्री निया शर्मा हिने आपल्या जीवनातला संघर्षमय किस्सा सांगितला आहे, चला तर जाणून घेउया.

टीव्ही सिरियल आणि चित्रपटातील कलाकारांना पाहून असे वाटते की, त्यांचे आयुष्य किती सुंदर आणि चांगले आहे. आणि काही जनांना तर त्यांच्या सारखेच आयुष्य जगावे असे वाटत असते. पण, तसे आयुष्य जगणे एवढे सोपे नसते त्याच्यामागे एक खडतर आयुष्य लपलेले असते. तसेच निया शर्माने  (Nia Sharma) दिलेल्या एकामुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण परिस्थिला ती कशी सामोरे गेली याच्याबद्दल तिने खुलासा केला. अभिनेत्रीने सांगितले की, ‘सुरुवातीच्या करिअरमध्ये नऊ महिने मी एक रुपया पण कमवला नव्हता.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

अभिनेत्री पुढे बोलली, “मी या इंडस्ट्रीमध्ये स्वत:च्या मेहनतीने पुढे आले आहे. ‘एक हजारो में मेरी बेहना हैं’ या सिरियलमुळे मला ओळख मिळाली पण, या सिरियलला बंद होउन ९ महिण्याचा गॅप झाला होता. तेव्हा मी एक रुपया पण कमावला नव्हता. एक हजारो में मेरी बेहना हैं संपल्यानंतर मला ९ महिण्यांनी टजमाई राजा’ या सिरियलमध्ये काम मिळाले.” मुंबईमध्ये ती एकटीच राहत होती, ती शहरामध्ये नवीन होती आणि काही खास मित्रही नव्हते तिने या महिन्यांमध्ये स्वत:वर लक्ष दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

निया म्हणाली की, “एक वेळ अशी होती ज्यामध्ये मला पुन्हा जगण्याची इच्छा नव्हती.” आता पहिल्यासारखे नाही राहिले आता इंस्टाग्रामद्वारे इनकम मिळवू शकतो, माझ्याकडे सध्या काही खास प्रोजेक्ट नाहीए पण मी म्युझिक आणि ब्रॅड सह्योगाने काम करत आहे.

तसंतर ही नियाने आधीच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. पण ती आता एका चांगल्या प्रोजेक्टवर काम करत आहे आणि ती आता ‘झलक दिख लाजा’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

बिग बॉस विजेता विशाल निकम पडला प्रेमात? ‘तु संग मेरे’ म्हणत दिली प्रेमाची कबुली
व्हायरल व्हिडिओनंतर करणसिंग ग्रोवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; म्हणाले, ‘तो बायकोच्या जिवावर जगतो…’
सस्पेंन्स, थ्रिलर आणि भयानक हत्येचा थरार, अक्षय कुमारच्या ‘कठपुतली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा