Monday, June 23, 2025
Home अन्य दहा वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची सुपरबोल्ड निया शर्मा, फोटोमध्ये ओळखनेही आहे कठीण!

दहा वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची सुपरबोल्ड निया शर्मा, फोटोमध्ये ओळखनेही आहे कठीण!

निया शर्मा (Nia Sharma) ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासोबतच तिची ड्रेसिंग स्टाइलही खूप पसंत केली जाते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना मदहोश करत असते. दरम्यान, नियाचा एक जुना फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तिला ओळखणे कठीण होत आहे. निया शर्माचा हा फोटो पोस्ट होताच व्हायरल होऊ लागला आहे.

फोटोतील नियाला ओळखणे झाले कठीण
निया शर्माने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती निया आहे हे कोणीही एका नजरेत सांगू शकणार नाही. निया कारच्या बोनेटवर बसून कॅमेराकडे पाहून हसत असल्याचे फोटोत दिसत आहे. तिचा लूकही आताच्या तुलनेत खूप वेगळा दिसतोय. अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस आउटफिट्समध्ये दिसणारी निया, या फोटोमध्ये साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे. कॅप्शनमध्ये नियाने सांगितले की, तिचा हा फोटो २०१२ सालचा आहे. (nia sharma photo viral see here how did she look like 10 years ago)

Photo Courtesy Instagramniasharma90

कपड्यांची खिल्ली उडवायचे मित्र- मैत्रिणी
निया शर्माने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, तिच्या फॅशन निवडीबद्दल मित्र- मैत्रिणी तिची खिल्ली उडवत असत. मुलाखतीत निया म्हणाली, “मला विचारले जायचे की, मी विचित्र लिपस्टिक का वापरते? हे चांगले दिसत नाही. मग मला विचारण्यात आले की, तू अवॉर्ड शोमध्ये नग्न का फिरते?”

नियाचे करिअर
निया शर्माने ‘एक हजारों में मेरी बहना है’ या शोमधून करिअरची सुरुवात केली होती. या शोमधील तिचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. या शोमधून नियाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. याशिवाय निया ‘जमाई राजा’, ‘इश्क में मरजावां’ आणि ‘नागिन’ सारख्या शोचाही भाग राहिली आहे. काही दिवसांपूर्वी नियाचा ‘गरबे की रात’ हा म्युझिक व्हिडिओ रिलीझ झाला होता, ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले.

हेही वाचा-

हे देखील वाचा