Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड भारीच ना! निया शर्माच्या बॅकलेस टॉपने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; राहुल वैद्यनेसोबत दिली हटके पोझ

भारीच ना! निया शर्माच्या बॅकलेस टॉपने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; राहुल वैद्यनेसोबत दिली हटके पोझ

टीव्हीवरील मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख बनवणारी अभिनेत्री निया शर्मा तिच्या हटके लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक यशस्वी मालिकांमध्ये अभिनय केला आहे. निया तिच्या वेगवेगळ्या लूकमुळे कधी चर्चेचा, तर कधी ट्रोलिंगचाही विषय बनते.

नुकतीच ती ‘दो घूंट’ या गाण्यामध्ये झळकली होती. या गाण्यातील तिच्या डान्सचे लाखो चाहते दीवाने झाले होते. प्रेक्षकांनी तिच्या या गाण्याला खूप पसंती दिली. या बरोबरच तिचे आणखीन एक नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी ती राहुल वैद्यबरोबर ‘गरबे की रात’ या गाण्यात झळकणार आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी दोघेही खूप ठिकाणी फिरत आहेत. (Nia Sharma wreaked havoc in her backless top, looked like this with Rahul Vaidya)

अशात या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नियाने काळ्या रंगाचा बॅकलेस टॉप आणि काळ्या पांढऱ्या रंगाच्या फ्रिल असलेला स्कर्ट घातला आहे. तसेच तिने ऑक्सीडाइज ज्वेलरी आणि स्मोकी आईजने हा लूक पूर्ण केला आहे. राहुलने यावेळी काळ्या रंगाचा एक टीशर्ट आणि त्यावर नारंगी रंगाचे जॅकेट घातले आहे. दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत.

नियाच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘काली’ या मालिकेमधून अभिनयाला सुरुवात केली, पण तिला विशेष पसंती मिळाली ती ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेमधून. या मालिकेत तिच्याबरोबर क्रिस्टल डिसूझा, करन टैकर आणि कुशाल टंडन हे कलाकार देखील उत्तम पात्र साकारताना दिसले होते. ‘नागिन’ मालिकेमध्ये देखील तिने नागिनीची भूमिका उत्तम साकारली होती. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. ‘गरबे की रात’ या गाण्याचा सेटवरील एक छोटा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना संपूर्ण गाणे पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर

-अंमली पदार्थ प्रकरणी अडकलेल्या आर्यन खानला गुरुवारी मिळणार जामीन? जाणून घ्या काय सांगतात प्रसिद्ध वकील

-पतौडी पॅलेसमधून होणाऱ्या कमाईबाबत सैफचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘माझी आईच घेते सर्व, मी फक्त नावापुरता…’

हे देखील वाचा