Tuesday, July 9, 2024

प्रियांका चोप्राचा पती निक जोनासला केले होते तातडीने रुग्णालयात दाखल, पण कशासाठी?

अमेरिकन गायक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास नुकताच शूटिंग दरम्यान जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, तो आता घरी परतला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, शनिवारी (१५ मे) शूटच्या सेटवर निकला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच्या दुखापतीबाबत फारशी माहिती समोर आली नाही.

रविवारी (१६ मे) निक घरी परत आला आहे. सोमवारपासून तो ‘द वॉयस’ या उर्वरित सिंगिंग रियॅलिटी शोचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी पोहोचला.

यापूर्वी २०१८ सालीही निकचा मेक्सिकोमध्ये शूटिंग दरम्यान अपघात झाला होता आणि या वेळी त्याच्या हाताला दुखापत झाली होती.

भारतातील कोरोनाचा कहर पाहून, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाठिंबा दर्शविला होता. वास्तविक प्रियांका आणि निकने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले होते की, “भारतासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. देणगी आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. कोविड १९ च्या लढाईत अजून बरेच काही करायचे आहे.”

यापूर्वी प्रियांकाचे एक ट्वीट व्हायरल झाले होते. ज्यामध्ये ती म्हणाली होती की, “माझे हृदय तुटत आहे, भारत कोव्हिड- १९ शी लढा देत आहे आणि अमेरिकेने ५५० दशलक्ष लशीची ऑर्डर दिली आहे. जगभरात हे वितरीत केल्याबद्दल अ‍ॅस्ट्रजेनिकाचे आभार. पण माझ्या देशातील परिस्थिती खूपच वाईट आहे. शक्य तितक्या लवकर भारतात लस पुरवठा करू शकाल का?”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल

हे देखील वाचा