बॉलिवूडमध्ये असे अनेक जाेडपे आहेत ज्यांच्या वयामध्ये फार अतंर आहे. मात्र, यामध्ये सर्वात प्रसिद्ध जाेडी म्हणजे निक जोनस आणि प्रियांका चोप्रा होय. दाेघांमधील वयाच्या अंतरामुळे ते अनेकदा ट्राेल हाेताना दिसतात. त्यांच्या लग्नाला जरी चार वर्षे झाले असले, तरी लाेक आजपण त्यांना ट्राेल करताना दिसतात. अशातच निकचा एक फाेटाे व्हायरल हाेत आहे. असे म्हटले जात आहे की, हा फाेटाे तेव्हाचा आहे, जेव्हा प्रियांका ‘मिस वर्ल्ड’ बनली हाेती. हा फाेटाे साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने आपल्या व्यावसायिक जीवनात खूप यश मिळवले आहे. तिने बाॅलिवूड ते हाॅलिवूडपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपले नाव राेशन केले. प्रियांकाने 2000 साली ‘मिस वर्ल्ड’चा पुरस्कार भारताला मिळवून दिला. मात्र, तुम्हाला माहित आहे का, त्यावेळी जोनस कसा दिसत हाेता?, तर निक जोनस त्यावेळी फक्त आठ वर्षांचा हाेता.
@priyankachopra
Wow 19 years ago you were crowned Miss World your confidence & personality is so good that you can win the worlds I am so proud of you Queen . pic.twitter.com/GlfE9yMtOi— Malessa Hussain . (@MalessaH) November 30, 2019
प्रिंयाका चोप्रा आणि निक जोनस 2 डिसंबर, 2018 राेजी विवाहबंधनात अडकले हाेते. हे लग्न खूप धुमधड्यात झाले हाेते. लग्नाच्या तीन वर्षानंतर सरोगसीद्वारे या जाेडप्याला एक मुलगी झाली. प्रियांका आणि निक जोनस सध्या पालकत्व एन्जॉय करत आहेत. जाेडप्याने यावर्षी जानेवारीमध्ये सरोगसीद्वारे आपल्या पहिल्या बाळाच्या स्वरुपात लेक मालती मेरी चोप्रा जोनस हिचे स्वागत केले. या दाेघांसाठी हा प्रवास इतका साेप्पा नव्हता. भरपूर अडचणीना सामाेरे जात त्यांनी आपल्या मुलीला मिळवले.
प्रिंयाकाच्या कामाविषयी बाेलायचे झाले, तर प्रिंयाका बाॅलिवूडमध्ये परतण्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असे म्हटले जात आहे की, प्रिंयाका फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकरताना दिसणार आहे. यामध्ये तिच्यासाेबत आलिया भट्ट हिच्यासह कॅटरीना कैफ हीदेखील दिसणार आहे. याव्यतिरिक्त प्रिंयाका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ आणि सीरिज ‘सिटाडेल’मध्ये दिसणार आहे. रूसो ब्रदर्स द्वारा निर्मित, ‘सिटाडेल’ प्राईम व्हिडिओ ओटीटीवर लवकरच येणार आहे. यात प्रिंयाकासाेबत रिचर्ड मॅडेन देखील आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
करीनाला आपल्या मुलांना द्यायचेत ‘असे’ संस्कार, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा
क्या बात है! ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ दाखवणारी आगळी वेगळी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अमिताभ यांना प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अलींनी दिवसा दाखवलेल्या चांदण्या, एका बुक्कीत…