Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड बॉक्स ऑफिसवर चांगलाच फसला शिल्पा शेट्टीचा ‘निकम्मा’, शो देखील करावे लागले रद्द

बॉक्स ऑफिसवर चांगलाच फसला शिल्पा शेट्टीचा ‘निकम्मा’, शो देखील करावे लागले रद्द

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि भाग्यश्रीचा (Bhagyashree) मुलगा अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani) यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘निकम्मा’ चित्रपट पडद्यावर अपयशी ठरत आहे. कमाई तर सोडाच, चित्रपटाचे शो देखील रद्द झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चित्रपट एका दिवसात केवळ लाखोंचा गल्ला जमवू शकत आहे. चित्रपटाची कमाई अशीच लाखात जात राहिली, तर ‘निकम्मा’ ५ कोटींचा व्यवसायही करू शकणार नाही. 

कोणत्या दिवशी किती कमाई?

१७ जूनला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या ‘निकम्मा’ने पहिल्या दिवशी ५१ लाखांचा व्यवसाय केला, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ जूनला या चित्रपटाने ४८ लाखांचा गल्ला जमवला. तिसर्‍या दिवशी म्हणजेच, रविवार १९ जून या ५२ लाखांचा गल्ला जमवला. एकूणच तीन दिवसांत चित्रपटाने केवळ १.५ कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘भूल भुलैया २’ची कमाई थांबण्याचे नाव घेत नाहीये. (nikamma’s bad performance on box office here see collection)

अभिमन्यू दासानीचा ‘निकम्मा’ १२५० स्क्रीन्सवर रिलीझ झाला होता. ‘निकम्मा’ हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘अबाई’चा हिंदी रिमेक आहे. अभिमन्यूच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूने २०१८ साली रिलीझ झालेल्या ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दुसरीकडे, शिल्पा शेट्टीने दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे, मात्र शिल्पाचा ‘निकम्मा’ आणि ‘हंगामा २’ यापैकी एकही चालला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा