Friday, December 5, 2025
Home बॉलीवूड सोनाक्षीचा ‘निकिता रॉय’ रिलीजपूर्वीच फ्लॉप?

सोनाक्षीचा ‘निकिता रॉय’ रिलीजपूर्वीच फ्लॉप?

‘निकिता रॉय’ (Nikita Roy) हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा अंदाज आला आहे.सोनाक्षी सिन्हाची (Sonakshi Sinha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास सुरुवात करताना दिसत नाहीये.

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा शेवटचं 2022 मध्ये ‘डबल एक्सल’ या चित्रपटात दिसली होती.आता ती ‘निकिता रॉय’ या हॉरर चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे.पण वाटतंय की,तिची ही परतफेर काही खास गाजणार नाही. ‘निकिता रॉय’ प्रदर्शित होण्यासाठी आता फक्त दोनच दिवस बाकी आहेत,आणि त्याआधीच सिनेमाच्या पहिल्या दिवशी किती कमाई होईल याचा अंदाज समोर आलाय.

हॉरर चित्रपट ‘निकिता रॉय’ चं दिग्दर्शन सोनाक्षी सिन्हाचा भाऊ कुश सिन्हाने केलं आहे.हा त्याचा पहिलाच चित्रपट दिग्दर्शक म्हणून आहे.पण हा चित्रपट प्रदर्शित होताना इतर अनेक चित्रपटांशी स्पर्धा करणार आहे.त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यासाठी चित्रपटाला खूप स्ट्रगल करावं लागेल,असं वाटतंय.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार,‘निकिता रॉय’ या चित्रपटची कमाई फारशी जोरात होणार नाही असं दिसतंय.स्पर्धा असल्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवशी फक्त १५ लाख रुपयांची कमाई करेल,असा अंदाज आहे. ही कमाई सोनाक्षीच्या शेवटच्या ‘डबल एक्सल’ चित्रपटसारखीच आहे.त्यामुळे ‘निकिता रॉय’ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरू शकतो.

‘निकिता रॉय’ कुणाच्या स्पर्धेत आहे?
‘निकिता रॉय’ 18 जुलैला थिएटर्समध्ये येतेय.त्याच दिवशी आणखी काही चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.त्यात अहान पांडेचा पहिलाच चित्रपट ‘सैयारा’ आणि अनुपम खेरचा ‘तन्वी द ग्रेट’ हे दोन चित्रपट आहेत. ‘सैयारा’ची कमाई ‘निकिता रॉय’ पेक्षा खूप जास्त होणार आहे,असा अंदाज आहे.पहिल्याच दिवशी हा चित्रपट 4.25 ते 4.50 कोटी रुपयांची कमाई करू शकतो.तर ‘तन्वी द ग्रेट’ची कमाई मात्र ‘निकिता रॉय’ सारखीच फक्त 15 ते 20 लाखांमध्येच राहू शकते.

सोनाक्षी सिन्हाला एखादा हिट चित्रपट मिळण्याची वाट बघत बघत आता 11 वर्षं झाली आहेत.तिचा शेवटचा हिट चित्रपट 2014 मध्ये आलेला ‘हॉलीडे’ होता. त्यानंतर 2019 मध्ये ‘दबंग 3’ आला,पण तोही फक्त सेमी-हिट ठरला.त्यानंतर तिने बरेच चित्रपट केले,पण एकाहीने काही खास चालून दिलं नाही,सगळेच फ्लॉप गेले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

कुश सिन्हाचं स्पष्टीकरण : सोनाक्षीच्या लग्नात मी होतो!

हे देखील वाचा