Friday, September 20, 2024
Home मराठी ठुकरा के मेरा प्यार…… अरबाज व निकीच्या नात्यात दुरावा…!!!

ठुकरा के मेरा प्यार…… अरबाज व निकीच्या नात्यात दुरावा…!!!

बिग बॉस मराठी च्या पाचव्या सीझनमध्ये , भाऊच्या धक्क्यानंतर टीम ए मध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. रितेश देशमुख यांनी मधील सदस्य अरबाज जान्हवी वैभव व निक्की यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे बघायला मिळाले…

भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसने निक्की समोर टीम ए ची पोलखोल केली. त्यामुळे निक्की ने टीम ए सोडण्याचा निर्णय घेतलेला दिसून आला. त्याचप्रमाणे बिग बॉस ने दिलेल्या नवीन कार्यामध्ये अभिजीत व निक्की ची जोडी बनवली आहे. त्यामुळे , निकी व अरबाज मध्ये जोरदार भांडणे झाल्याचे दिसून आले. भांडण दरम्यान अरबाज ने घरातल्या वस्तूंची तोडफोड केली, याचाच परिणाम म्हणून बिग बॉस ने त्याला शिक्षा दिली. त्यामुळे या आठवड्याच्या कॅप्टनसी कार्यात अरबाज सहभागी होऊ शकणार नाही.

घरातल्या या वातावरणाने घरातील इतर सदस्य अरबाज व निक्की फिरकी घेताना दिसत आहेत. बिग बॉस मराठी चा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये घरातील इतर सदस्य निक्कीला चिडवत असल्याचे दिसून आले. निकी कडे बघून सुरज म्हणतो , ” ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी…” त्यानंतर घरातील इतर सदस्य “तुम मुझे छोडके जाओगे तो बडा पचतावगी” हे गाणे म्हणतताना दिसून येत आहे. यानंतर निक्की व अरबाजला सुद्धा हसू अनावर झाल्याचे दिसून येते.

दरम्यान या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद असल्याने या आठवड्यात कोणीही बाहेर जाणार नाही. तसेच, या आठवड्यात कॅप्टनसीचा मान कोण मिळवत हे पाहणे नक्कीच मनोरंजक असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

कंगनाने फक्त सलमान आणि रणबीरचाच नाही तर अक्षय कुमारचा चित्रपटही नाकारला!
विजय सेतुपतीने का नाकारला आरसी 16 चित्रपट; मोठे कारण आले समोर

author avatar
Shruti Pathak

हे देखील वाचा