Wednesday, March 12, 2025
Home अन्य व्हिडिओ: बीचवर नक्की तांबोळी आणि वरुण सूदने केला अनोखा वर्कआऊट, निक्कीची रिऍक्शन पाहण्यासारखी

व्हिडिओ: बीचवर नक्की तांबोळी आणि वरुण सूदने केला अनोखा वर्कआऊट, निक्कीची रिऍक्शन पाहण्यासारखी

टीव्हीवरील ‘खतरों के खिलाडी ११’ या प्रसिद्ध शोची शूटिंग केपटाऊनमध्ये सुरू आहे. यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक मजा- मस्ती करताना दिसतात. यामध्ये निक्की तांबोळी हिचाही समावेश आहे. निक्की खतरनाक स्टंट करण्यासोबतच ती इतर स्पर्धकांसोबत मस्तीही करत आहे. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शूटिंग दरम्यान आलेले चांगले- वाईट अनुभव तसेच मस्तीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच निक्कीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती वरुण सूद, सना मकबूल आणि विशाल आदित्य सिंगसोबत दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निक्की बीचवरील खुर्चीवर झोपलेली दिसत आहे. तेवढ्यात वरुण सूद तिची खुर्ची उचलून अनोखा वर्कआऊट करू लागतो. निक्की भीतीने ओरडू लागते. तरीही ती या मजेशीर वर्कआऊटचा आनंद लुटतानाही दिसत आहे.

निक्की तांबोळी ‘खतरों के खिलाडी ११’ चा भाग बनल्यामुळे खूपच आनंदी आहे. ती आपला भाऊ जतिनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टीच्या या शोचा भाग बनली आहे. नक्कीच्या भावाचे काही आठवड्यांपूर्वीच कोरोना व्हायरसमुळे निधन झाले होते. जतिनला कोरोनाव्यतिरिक्त इतर अनेक शारीरिक समस्या होत्या. भावाच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतरच ‘खतरों के खिलाडी ११’ची शूटिंग करण्यासाठी निक्कीला वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आले होते.

‘खतरों के खिलाडी ११’ या शोमध्ये निक्की तांबोळीव्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध कलाकार स्पर्धक म्हणून सामील झाले आहेत. त्यांमध्ये दिव्यांका त्रिपाठी, आस्था गिल, श्वेता तिवारी, राहुल वैद्य, अनुष्का सेन, महक चहल आणि अर्जुन बिजलानी यांचाही समावेश आहे. हा शो कलर्स चॅनेलवर जुलै महिन्यात टेलिकास्ट केला जाणार आहे.

हे देखील वाचा