Saturday, March 7, 2026
Home साऊथ सिनेमा व्वा क्या बात! बिग बॉस फेम दक्षिणात्य अभिनेत्री निक्की तांबोळी करणार कोरोनाग्रस्तांना अशाप्रकारे करणार मदत

व्वा क्या बात! बिग बॉस फेम दक्षिणात्य अभिनेत्री निक्की तांबोळी करणार कोरोनाग्रस्तांना अशाप्रकारे करणार मदत

कोरोना विषाणूमुळे सारे जग त्रासले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या टप्प्यात सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. काही लोक मृत्यूशी झुंज देताय तर, काही लोक घरूनच उपचार घेत आहेत. अलीकडेच बिग बॉस १४ फेम दाक्षिणात्य अभिनेत्री निक्की तांबोळीसुद्धा कोरोनाची शिकार झाली होती. निक्की तांबोळीने घरीच या रोगाचा पराभव केला आहे आणि, आता ती कोरोनामुक्त झाली आहे. दरम्यान, कोरोनामधील आजारी लोकांना मदत करण्यासाठी या अभिनेत्रीने एक हात पुढे केला आहे. स्वत: तीनेच याबाबत माहिती दिली आहे.

कोवीडमुक्त झाल्यानंतर निक्की तांबोळी हिने प्लाझ्मा दान करण्याची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट केले की, ती लवकरच शासकीय रुग्णालयात कोरोना पीडितांसाठी प्लाझ्मा दान करणार आहे. इतकेच नाही तर, तिचा भाऊही कोरोना विषाणूला बळी पडल्याचे तिने सांगितले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निक्की म्हणाली, “कोरोनापासून मुक्त झाल्यावर आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर, आता मी या आजाराने ग्रस्त असलेल्यांसाठी शासकीय रुग्णालयात प्लाझ्मा दान करणार आहे. ज्यांना या  आजाराने घेरले आहेत आणि, असे लोक ज्यांच्यामुळे हा आजार पसरू शकतो, त्यांना या प्लाझ्माचा उपचार  म्हणून फायदा होईल. माझा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे. मी कोरोना पीडितांना माझा प्लाझ्मा दान करणार आहे.” एवढेच नव्हे तर कोरोनातुन  बाहेर पडलेल्यांना तिने आवाहन केले आहे की, तुम्हीपण प्लाझ्माची मदत करा.

निक्की म्हणाली, “माझा स्वतःचा भाऊही कोरोनाला बळी पडला आहे. तो रुग्णालयात दाखल आहे. मी पुन्हा प्रत्येकाला स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करते. इथली परिस्थिती खूप वाईट आहे. जेव्हा जेव्हा माझे कुटुंब मला फोन करते तेव्हा, मला भीती वाटते की काय बातमी असेल माहित नाही. मी प्रार्थना करते की, कोरोनाची ही परीस्थिती लवकर निवळेल.” बिग बॉस १४ फेम प्रसिद्ध अभिनेत्री निक्की तांबोळीने अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये दिसली आहे.

हे देखील वाचा