Saturday, August 2, 2025
Home साऊथ सिनेमा Video: पॅपराजींसमोर हात जोडताना दिसली ‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळी, काय आहे नेमकं प्रकरण?

Video: पॅपराजींसमोर हात जोडताना दिसली ‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळी, काय आहे नेमकं प्रकरण?

‘बिग बॉस’ या रियॅलिटी शोमधून लोकप्रिय झालेली निक्की तांबोळी (Nikki Tamboli) कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. ती नेहमी स्वतःचे असे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, जे पाहून तिचे चाहते अक्षरशः वेडे होतात. अशातच आता निकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने असे काही केले आहे की, ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पॅपराजींसमोर जोडले हात
व्हिडिओमध्ये निक्की तांबोळी पॅपराजींसमोर हात जोडताना दिसत आहे. खरं तर, तिचा हा व्हिडिओ विमानतळावरील आहे. यावेळी ती फोटोग्राफर्ससमोर पोझ देऊन फोटो क्लिक करत असते. तेव्हा फोटोग्राफर्सने तिला विचारले की, “तुला ‘बिग बॉस’च्या टॉप ३मध्ये कोणाला बघायचे आहे?” प्रत्युत्तरात ती शमिता शेट्टीचे नाव घेते. ती म्हणते, “मला शमिताला जिंकताना पाहायचे आहे. तसे तर कोणीही जिंकू शकतो, पण शमिताने विजेती व्हावी अशी माझी इच्छा आहे.” यादरम्यान, निक्कीला विचारण्यात आले की ती फिनालेमध्ये सहभागी होणार का? थोडा वेळ विचार करून ती बोलते, “कदाचित!” (bigg boss ex contestant nikki tamboli folded her hands in front of paparazzi)

पॅपराजींना केलं ‘हे’ आवाहन
निक्की तांबोळी कारमध्ये बसल्यानंतर तिचे हात स्वच्छ करते. ती कारची खिडकी खाली करते आणि पॅपराजींशी बोलते, “आजकाल कोव्हिड खूप वाढत आहे. स्वतःची काळजी घ्या आणि मास्क घालायला विसरू नका. आपले हात स्वच्छ करत रहा. एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतःची काळजी घ्या.” यादरम्यान ती पॅपराजींना हात जोडून विनंती करते. ती पुढे म्हणते, “काहीही थांबू नये. कोणाचेही काम थांबू नये.” यानंतर निक्की निघून जाते.

‘बिग बॉस १४’चा राहिलीय भाग
निक्की तांबोळी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण तिला खरी ओळख ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनपासून मिळाली. या सीझनमध्ये, निक्की तांबोळी केवळ तिच्या ऍटिट्यूडमुळेच चर्चेत राहिली नाही, तर तिच्या गेम प्लॅनने चाहत्यांना वेड लावले. ती या शोची ट्रॉफी जिंकू शकली नसली, तरी ती दुसरी रनरअप होती.

हेही वाचा-

हे देखील वाचा