Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

RRR खतरनाक! निलेश साबळेने शेअर केला सेटवरच्या डान्स प्रॅक्टिस व्हिडिओ, ‘हा’ डान्स पाहून हसून व्हाल बेजार

मराठीमध्ये सर्वात विनोदी आणि लोकप्रिय शो कोणता असे कोणीही विचारले तर सर्वांच्या तोंडातून एकाचवेळी एकच उत्तर बाहेर पडेल आणि ते म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या शोने लोकप्रियतेचे नवनवीन रेकॉर्ड आणि प्रसिद्धीची विविध शिखरं गाठली आहे. या शोमधील सर्वच पात्र रसिकांचे अगदी पुरेपूर मनोरंजन करतात. या शोची भुरळ हिंदी मनोरंजनविश्वातील सर्वात मोठ्या असणाऱ्या तिन्ही खानांना देखील पडली आणि त्यांनी देखील शोमध्ये हजेरी लावली होती. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे, जो शो तुम्हाला टीव्हीवर ऑन कॅमेरा एवढा हसवतो, त्या शोच्या शूटिंगच्या वेळेस किती धमाल आणि मजा येत असेल. ऑफ कॅमेरा हे कलाकार जी धमाल करतात त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

या सर्व अतरंगी कलाकारांना बांधून ठेवणारा आणि त्यांच्याकडून काम करून घेणारा त्यांचा मॉनिटर आर्थर डॉ. निलेश साबळेने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक हटके व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये चला हवा येऊ द्या मधील सर्वच कलाकार डान्स करताना दिसत आहे. हाच व्हिडिओ झी मराठी चॅनेलच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील शेअर करण्यात आला आहे. या शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कुशल बद्रिके, भाऊ कदम, उमेश जगताप, स्नेहल शिदम, अंकुर वाढवे आदी कलाकार दिसत आहे. यात हे सर्व कलाकार त्यांच्या आगामी स्किटची तयारी करताना दिसत असून, नृत्यदिग्दर्शक कुशलला डान्स शिकवताना दिसत आहे.

व्हिडिओच्या मागे आरआरआर सिनेमातील तुफान गाजत असणारे ‘नाचो नाचो’ गाणे वाजत असून, या गाण्याची हुक स्टेप्स करण्याचा प्रयत्न कुशल, स्नेहल आणि अंकुर करताना दिसत आहे, तर भाऊ कदम आणि उमेश जगताप काहीतरी वेगळ्याच स्टेप्स करत आहे. हा मजेदार व्हिडिओ शेअर करताना निलेशने कॅप्शनमध्ये लिहिले, “काही लोक कोरिओग्राफरचं तंतोतंत ऐकतात …. आणि काही आपल्या पद्धतीनं तो डान्स वळवून घेतात ….शेवटी काय आहे डान्स RRR खतरनाक…असला पाहिजे … आगामी skit मधली धमाल…” सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यावर चला हवा येऊ द्या मधील सर्वच कलाकारांनी कमेंट्स केल्या असून, शिवाय त्यांचे फॅन्स देखील यावर भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

विकी कौशलने साली इसाबेल कैफला दिल्या अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा

अक्षय खन्नासोबत डेब्यू करणार होती बिपाशा, लग्नाआधी केले ‘या’ ३ अभिनेत्यांना डेट

Supriya@61: शाहिद कपूरची सावत्र आई असलेल्या सुप्रिया पाठक यांचा ‘हंसा पारेख’ होण्याचा थक्क करणारा प्रवास

हे देखील वाचा