अमोल पाराशर हा लोकप्रिय अभिनेता आहे. जो ‘ग्राम चिकित्सालय’ या सिरिजच्या पहिल्या सीझनमध्ये उत्तम कामगिरी केली तसेच ही मालिका गाजली देखील. तर आता या सिरीजच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. या सिरीजचा दुसरा सीजन ची घोषणा आता करण्यात आली आहे. ज्यात अमोल पराशर आणि आकांक्षा रंजन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. तर या मध्ये एक सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्यांची रोमांचक एन्ट्री झाली आहे.
दिनेश लाल यादव,(yadav) हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, ते ‘ग्राम चिकित्सालय’च्या दुसऱ्या सीझनमध्ये सामील झाले आहेत. यापूर्वी ते ‘भाभी जी घर पर हैं: फन ऑन द रन’ या हिंदी चित्रपटात दिसले होते, जो 6 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. आता अशी आशा आहे की, त्याच्या आगमनाने मनोरंजनाची पातळी दुप्पट होईल.
‘ग्राम चिकित्सालय 2’ व्यतिरिक्त, दिनेश लाल यादव प्राईम व्हिडिओच्या ‘टू-व्हीलर सीझन 2’ आणि रवी किशनच्या ‘माला लीगल है सीझन 2’ मध्येही दिसणार आहे, जे 3 एप्रिल 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. मात्र, निर्मात्यांनी त्याच्या भूमिकेबद्दल, या आगामी प्रकल्पांमध्ये तो कोणती भूमिका साकारणार आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. तर दिनेश लाल यादव एक सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेते, गायक आणि राजकारणी आहेत, जे 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाले. त्यांनी 2022 च्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांचा पराभव करून महत्त्वपूर्ण आझमगड लोकसभा जागा जिंकली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा









