Friday, July 5, 2024

काय सांगता! ‘या’ भीतीमुळे भोजपुरी सुपरस्टार निरहुआ कधीच गेला नाही त्याच्या सासरवाडीत; स्वत:च केला खुलासा

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ‘जुबली स्टार’ अशी ओळख असलेला निरहुआ म्हणजेच दिनेशलाल यादव हा प्रसिद्ध अभिनेता आहे. दिनेश यादव ज्या चित्रपटात भूमिका करतो तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सुपरहिट ठरतो, असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. निरहुआच्या चित्रपटातील भूमिके इतकीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा त्याच्या चाहत्यांना असते. निरहुआ सोशल मीडियावर सुद्धा सतत चर्चेत असतो. एका कार्यक्रमात बोलताना निरहुआने त्याच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा सांगताना “मी कधीच सासरवाडीला गेलो नाही” असा चकित करणारा खुलासा केला होता.

निरहुआच्या कधीच सासरवाडीला न जाण्यामागे तिथली एक विशिष्ट प्रथा कारणीभूत आहे. फक्त निरहुआच नव्हे, तर त्याचे वडील आणि आजोबासुद्धा कधी आपल्या सासरवाडीला गेले नाहीत. नेमकं काय आहे यामागचं कारण चला तर जाणून घेऊ…

निरहुआ म्हणजेच दिनेशलाल यादव भोजपुरी चित्रपट क्षेत्रातील आघाडीचा अभिनेता आहे. निरहुआच्या चित्रपटांइतकीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत असते. एका मुलाखतीत बोलताना निरहुआने आयुष्यात कधीच सासरवाडीला न गेल्याचा चकित करणारा खुलासा केला होता. आणि त्यामागे असलेल्या एका प्रथेचा सुद्धा उल्लेख केला होता.

यावेळी निरहुआने सांगितले होते की, त्यांच्या गावात लग्नानंतर सासरवाडीला जाणे अशुभ मानले जाते. जो मुलगा लग्नानंतर सासरवाडीला जातो त्याची थट्टा केली जाते. इतकेच नव्हे तर निरहुआचे वडील आणि आजोबासुद्धा कधी आपल्या सासरवाडीला गेले नाहीत. त्याच प्रथेमुळे निरहुआ कधी आपल्या सासरवाडीला गेला नाही.

याबद्दल पुढे बोलताना निरहुआ म्हणाला की, त्याच्या पत्नीला सुद्धा त्याचे सासरवाडीला जाणे आवडत नाही. कारण, निरहुआच्या आधी ज्या मुलासोबत त्यांचे लग्न होणार होते. तो सासुरवाडीला बघायला आला आणि त्यांनंतर त्यांच लग्न मोडले.

दिनेशलाल यादवच्या पत्नीचे नाव मंशादेवी असून त्यांना दोन मुले सुद्धा आहेत. निरहुआने ‘चलत मुसाफिर मोह लिया रे’ चित्रपटाद्वारे भोजपुरी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. परंतु 2008 मध्ये प्रदर्शित झालेला ‘निरहुआ रिक्शावाला’ चित्रपटातील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’

-आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी, बेल मिळेल की पुन्हा कोठडी?

-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण

हे देखील वाचा