Thursday, October 16, 2025
Home टेलिव्हिजन KKK 12 | ‘या’ स्पर्धकावर डुकरांनी केला हल्ला, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही फुटेल घाम

KKK 12 | ‘या’ स्पर्धकावर डुकरांनी केला हल्ला, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही फुटेल घाम

टीव्ही रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी सीझन १२’मध्ये स्पर्धकांवरील अत्याचार वाढत आहेत. अत्याचारी वीकमध्येही सर्व स्टार्सचा जीव अडकला आहे. आता शोचा एक नवीन प्रोमो रिलीझ झाला आहे, ज्यामध्ये दोन स्पर्धकांना रानडुकरांमध्ये सोडण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती इतकी बिघडली की, चाहतेही चिंता व्यक्त करत आहेत.

कलर्स टीव्हीच्या इंस्टाग्राम हँडलवर हा प्रोमो व्हिडिओ रिलीझ करण्यात आला आहे. यामध्ये शोचा होस्ट रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा तुषार कालिया (Tushar Kalia) आणि निशांत भट्ट (Nishant Bhatt) या स्पर्धकांना टास्क देत आहे. या टास्कमध्ये डुकरांना एका एनक्लोजरमध्ये भरले जाते. टास्क असे आहे की दोन्ही स्पर्धकांना या डुकरांच्या मधून जावे लागते आणि बाहेर पडावे लागते. रोहित शेट्टी तुषार आणि निशांतला विचारतो की, डुक्कर पाहून तुम्ही इतके का घाबरलात? (nishant bhatt gets injured during pig task)

खालील लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडिओ:

https://www.instagram.com/p/CgJTkyfDnJK/?utm_source=ig_embed&ig_rid=6b79febc-8bfc-44a7-8372-cdabb4cc10df

‘खतरों के खिलाडी’चा हा प्रोमो व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहतेही चिंतेत दिसत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक निशांतबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “अरे देवा! या डुकरांनी निशांत भट्टला चावले.” दुसऱ्या यूजरने लिहिले, “अरे यार हे खूप चुकीचे आहे.” सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निशांतचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्याच वेळी, काही लोकांना हा स्टंट अजिबात आवडला नाही, कारण यामुळे स्पर्धकांचे शारीरिक नुकसान होत आहे.

तसेच, या शोचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होत आहे. स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले, तर यावेळी रुबिना दिलैक, सृती झा, शिवांगी जोशी, कनिका मान, मोहित मलिक, निशांत भट्ट, राजीव अडातिया, तुषार कालिया, एरिका पॅकार्ड, चेतना पांडे आहेत. त्याचवेळी अनेरी वजानी शोमधून बाहेर पडली आहे. हा कार्यक्रम २ जुलैपासून कलर्स वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रसारित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा