Monday, June 9, 2025
Home अन्य महागडे गिफ्ट! पत्नी नीताला ४४व्या वाढदिवशी मुकेश अंबानी यांनी दिले होते खासगी विमान भेट, किंमत वाचून जाल भारावून

महागडे गिफ्ट! पत्नी नीताला ४४व्या वाढदिवशी मुकेश अंबानी यांनी दिले होते खासगी विमान भेट, किंमत वाचून जाल भारावून

बॉलिवूड कलाकार लक्झरी लाईफस्टाईलसाठी ओळखले जातात, यात काही वाद नाही. परंतु याव्यतिरिक्तत भारताचे सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंबही याबाबतीत मागे नाही. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी त्यांच्या लक्झरी लाईफस्टाईलसाठी ओळखल्या जातात. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्या जपानमधील सर्वात जुने क्रोकरी ब्रँड ‘नोरिटेक’ कपात चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात. नीता अंबानीच्या बॅगमध्येही हिरे जडलेले असतात. व्यावसायिक जगात नीता जितक्या प्रसिद्ध आहेत, तितक्याच त्या त्यांच्या ग्लॅमर अवतारासाठीही ओळखल्या जातात. ही लक्झरी लाईफस्टाईल टिकवण्यासाठी त्यांचे पती मुकेशही कसलीच कसर सोडत नाहीत.

नीताला लक्झरी लाईफस्टाईल तसेच मौल्यवान वस्तूंची खूप आवड आहे. श्रीमती अंबानी केवळ महागड्या वाहनांमध्येच फिरत नाहीत, तर त्यांचे स्वत: चे खासगी विमानही आहे, ज्यामध्ये त्यांना प्रवास करायला आवडते. मुकेश अंबानी यांनी पत्नीच्या 44 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खासगी विमान भेट केले होते.

या खासगी विमानाची किंमत सुमारे 230 कोटी रुपये आहे. मुकेश अंबानी यांनी पत्नीच्या 44 व्या वाढदिवशी त्यांना कस्टम फिटेड एअरबस-368 लक्झरी खासगी विमान भेट म्हणून दिले होते. या विमानामध्ये, 10-12 लोक एकत्र प्रवास करू शकतात. मुकेश अंबानी त्यांच्या बोईंग बिझनेस जेटचा वापर करतात, तर नीता अंबानी यांना त्यांच्या खासगी विमानात प्रवास करायला आवडते.

मुकेश अंबानी यांनी नीताच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार हे जेट कस्टमाईज करून घेतले आहे. या विमानात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. विमानाच्या आत जेवणाचा हॉलही आहे. तसेच, त्यांचा मूड हलका करण्यासाठी यात एक स्काय बार देखील आहे. नीता बर्‍याच वेळा यातून प्रवास करताना दिसल्या आहेत.

या खासगी जेटमध्ये करमणूक व गेमिंगची देखील पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये म्युझिक सिस्टीम, सॅटेलाईट टेलिव्हिजन आणि वायरलेस कम्युनिकेशनच्या सर्व सुविधा आहेत. पेज 3 पार्ट्या, आयपीएल सामने किंवा अनेक फॅशन शो दरम्यानही नीता अंबानीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खबरदारी महत्त्वाची! बीएमसीच्या कारवाईनंतर अभिनेत्री झाली सावध, स्वत: सोबत फोटोग्राफर्सचेही हात केले सॅनिटाईझ

-मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला एनसीबीने मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात, ‘या’ टोळीशी संबंध असल्याची शक्यता

-“फोनवर तिचा आवाज ऐकला की हृदय तुटतं” म्हणत सतीश कौशिक झाले आजारी मुलीच्या आठवणीत भावुक

हे देखील वाचा