अनेक उत्तमोत्तम चित्रपट बनवलेले दिग्दर्शक आणि लेखक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) पुन्हा एकदा एका चित्रपटाचे शूटिंग करणार आहेत. या चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून प्लॅनिंग केले जात होते. खरं तर, ‘छिछोरे’ आणि ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी लखनऊमध्ये त्यांच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माता त्यांच्या टीमसह उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये होते आणि त्यांच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी मार्चच्या अखेरीस येथे येण्याची अपेक्षा आहे. लखनऊ येथील नितेश तिवारी यांचे काही फोटोही समोर आले आहे.
लखनऊमध्ये होणार काही भागांचे शूटिंग
नितेश तिवारीच्या या शीर्षक नसलेल्या चित्रपटात वरुण धवन (Varun Dhawan) दिसणार आहे, तसेच अनेक आघाडीच्या अभिनेत्रींच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. टीमला जवळपास ३० दिवस शहरात शूट करायचे आहे, तर काही सीन कानपूरमध्ये शूट करण्याचे नियोजन आहे. (nitesh tiwari is now going to shoot his next film in this city know full details know how)
माध्यमातील वृत्तानुसार, त्यांना युनिटच्या जवळच्या स्त्रोताने सांगितले की, “टीम चार दिवस येथे होती आणि आम्ही संपूर्ण शहर कव्हर केले आणि अखेरीस ठिकाणे लॉक करण्यात आली. काही मोठ्या घरांना झिरो करण्यात आले आहे, जिथे चित्रपटाचे मुख्य शूटिंग होणार आहे. अनेक पासिंग शॉट्स आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी शूट केले जातील.”
उत्तर प्रदेशच्या निवडणुकींच्या निकालानंतर सुरू होणार शूटिंग
आता, उत्तर प्रदेशच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात असल्याने आणि १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार असल्याने, लखनऊमध्ये शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. अनिल शर्मा ‘गदर-२’ची शूटिंग करणार आहेत. त्यानंतर सूरज बडजात्याचा ‘उंचाई’ आणि इतर अनेक प्रोजेक्ट्स आहेत. निवडणुका आणि तिसऱ्या साथीच्या लाटेमुळे २०२२ च्या सुरुवातीपासून शूटिंग मंदावली आहे, जी आता तीव्र होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा –