चित्रपटसृष्टीमध्ये असे फार कमी कलाकार आहेत. जे लहानपणापासून एकत्र होते, तसेच त्यांनी एकत्र चित्रपटसृष्टी गाजवली. यातीलच एक जोडी म्हणजे निवेदिता सराफ आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. अनेकांना ही गोष्ट माहित देखील नसेल की, निवेदिता आणि लक्ष्मीकांत एकमेकांचे लहानपणापासून खूप चांगले मित्र होते. जवळपास १० वर्ष ते एकमेकांच्या घरा शेजारी राहत होते. त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटात देखील काम केले आहे. आज लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या आठवणी चित्रपटाद्वारे आजही आपल्यात आहेत. अशातच निवेदिता सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच एक आठवण शेअर केली आहे.
अनेकांना ही गोष्ट माहित असेल की, निवेदिता सराफ खूप छान स्वयंपाक बनवतात. त्यांचा यूट्यूबवर एक रेसिपी चॅनल देखील आहे. अशातच त्यांनी एक व्हिडिओ या चॅनलवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच एक आठवण शेअर केली आहे.
ही आठवण सांगत असताना निवेदिता सराफ म्हणतात की, ‘लक्ष्यासोबत मी अनेक नाटकात, सिनेमात काम केलंय. त्याला एक डिश अतिशय आवडती होती. सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणात, संध्याकाळी चहाच्यावेळी आणि रात्रीच्या जेवणावेळी अशी कधीही ही डिश खायची त्याची तयारी असायची, ती म्हणजे खोबऱ्यातली सुरमई.”
एका मुलाखतीत निवेदिता यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची अशीच एक आठवण शेअर केली होती. लग्नाआधी नाटकाच्या दौऱ्यानिमित्त रात्री अपरात्री घरी जायला खूप उशीर होणार असेल तर निवेदितांचा मुक्काम लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरी असायचा. एकदा असाच उशीर होणार असल्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या घरी त्या मुक्कामाला होत्या.
मी लक्ष्याच्या घरी आहे हे कळविण्यासाठी निवेदिता यांनी आईला फोन केला. पलीकडून आईने फोन उचलल्यावर ‘मी लक्ष्याच्या घरी आहे, असं आईला सांगत असतानाच समोर मोठ्ठ झुरळ दिसल्यानं निवेदिता जोरात किंचाळल्या आणि त्यांनी फोन कट केला. यावर, तू माझ्या घरी आहेस एवढंच सांगितलंस आणि किंचाळलीस… तुझ्या आईला काय वाटेल, असं लक्ष्मीकांत म्हणाले. मग काय निवेदिता यांनी लगेच पुन्हा आईला फोन केला आणि सगळी हकीकत ऐकवली. अशाप्रकारे त्यांच्यातील मैत्री खूप घट्ट होती.
हेही वाचा :
–पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी होती देश सोडण्याच्या तयारीत, राज कुंद्राने केला मोठा खुलासा
–चाहत्यांच्या ‘त्या’ कृत्यांनंतर लक्ष्मीकांत यांनी दाखवलेल्या नम्रतेमुळे त्यांनी जिंकले होते लोकांचे मनं