2005 मध्ये ‘नो एंट्री‘ हा चित्रपट आला होता. आणि आता त्याचा सीक्वल येणार आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या मूळ चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, लारा दत्ता, बिपाशा बसू आणि ईशा देओल यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे होते. पण, सीक्वलमध्ये जुन्या स्टारकास्टची पुनरावृत्ती होणार नाही, सगळे फ्रेश चेहरे असतील. नुकतेच निर्माते बोनी कपूर यांनी याचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच, चित्रपटाच्या रिलीज डेटवर अपडेट देण्यात आले आहे.
‘नो एन्ट्री’ या कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा यापूर्वीच झाली आहे. तेव्हापासून त्याच्याशी संबंधित प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, चित्रपटाच्या सीक्वलमध्ये मूळ कलाकार दिसणार नसल्याचे कळल्यावर चाहत्यांची निराशा झाली. नुकतेच बोनी कपूर यांनी याचे कारण सांगितले आहे. नुकतेच न्यूज 18 शोशाशी संवाद साधताना बोनी कपूर यांनी या चित्रपटाविषयी बोलताना पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले.
बोनी यांनी सांगितले की सर्व प्रेक्षक हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की मूळ कलाकार का नाही? ते म्हणाले, ‘मी बराच वेळ वाट पाहिली, पण प्रत्येकाची स्वतःची कारणे होती. मी त्या सर्वांचा आणि त्यांच्या कारणांचाही आदर करतो. त्यामुळे आता हा सीक्वल संपूर्ण नॉव्हेल्टी पॅकेजिंगमध्ये प्रदर्शित होणार आहे. बोनी कपूर यांनी प्रेक्षकांना आश्वासनही दिले की बहुप्रतिक्षित सिक्वेल अपेक्षांवर खरा ठरेल कारण त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
बोनी कपूर पुढे म्हणाले की, त्यांनी निवडलेले विषय पाहता हा सिक्वेल ‘नो एंट्री’ पेक्षाही चांगला असेल याची मला खात्री आहे. बोनी कपूर यांनी सांगितले की, ‘नो एंट्री 2’चे शूटिंग जून किंवा जुलै 2025 मध्ये सुरू होईल. हा चित्रपट 26 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित होणार आहे. निर्मात्याने सांगितले की, निर्धारित वेळेत शेड्यूल पूर्ण होईल अशी पूर्ण आशा आहे. ‘नो एंट्री 2’मध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूर यांसारख्या स्टार्सच्या आगमनाची बातमी आहे. अनीस बज्मी दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या लीडचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
चक्क विवेक ओबेरॉयने नाकारला होता शाहरुख खानचा चित्रपट; या मोठ्या सिनेमाची आली होती ऑफर…