Friday, March 27, 2026
Home टेलिव्हिजन ‘क्योंकि रिश्तों के भी रूप बदलते हैं’मुळे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’बंद होणार? आता मेकर्सनी अफवांना दिला पूर्णविराम

‘क्योंकि रिश्तों के भी रूप बदलते हैं’मुळे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’बंद होणार? आता मेकर्सनी अफवांना दिला पूर्णविराम

टेलिव्हिजन मध्ये अशा अनेक मालिका आहे, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अशीच एक सिरीयल म्हणजे ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’  ही आहे तर या सिरीयल बाबत सध्या चर्चा सुरू आहे.  ती म्हणजे या मालिकेचा दुसरा सीजन रद्द होणार असल्याची चर्चा होती, आणि काही दिवसांपूर्वी ही मालिका संपून त्या जागी दुसरी मालिका सुरू होईल हेही विधान चर्चेत होते ‘क्योंकी रिश्तों के भी रूप बदलते हैं’ या मालिकेचा प्रीमियर झाला होता आणि त्या दरम्यान ‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’ ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. 

‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’ ही मालिका संपणार असल्याच्या चर्चाना आता निर्माते आणि प्रक्षेपक स्टार प्लस यांनी पुर्णविराम दिला आहे. चॅनलने 26 मार्च रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणाले की बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. मालिका बंद करण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की हे दावे पूर्णपणे निराधार आहेत. आम्ही ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ बंद करत नाही आहोत.

एकता (Ekta)कपूरची सर्वात लोकप्रिय मालिका 17 वर्षांच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या सीझनसह परत आली आहे.  तर ‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’ चा प्रीमियर 29 जुलै, 2025 रोजी झाला. स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय यांनी तुळसी आणि मिहिर विराणीच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

1200 कोटी बजेटच्या सिनेमात रणबीर कपूरचा अनोखा लुक, सहा दिवसात अजून एक सरप्राईज होणार उघड

हे देखील वाचा