Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड ‘दिलबर गर्ल’चा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक होतोय प्रचंड व्हायरल, काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसतेय कमालीची मादक !!

‘दिलबर गर्ल’चा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक होतोय प्रचंड व्हायरल, काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसतेय कमालीची मादक !!

आपल्या हटके डान्स स्टाईल आणि सेक्सी लूकमुळे भल्याभल्यांची झोप उडवणारी नोरा फते ही सध्या बरीच चर्चेत आहे. आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचे अनेक गाणे हिट झाले आहेत. मग ते सत्यमेव जयते मधील ‘दिलबर दिलबर’ असो किंवा स्त्री सिनेमातील ‘कमरिया’ हे आयटम सॉंग. आपल्या प्रत्येक गाण्यातून ती अनेकांना ठेका धरायला भाग पाडते. सोबतच हाय गर्मी या तिच्या गाण्याने तर अनेक तरुणांना मोहून टाकले होते. तिचे मनमोहन सौंदर्य, अदा आणि वेगळी अशी डान्स स्टाईल हीच तिची खरी ओळख आहे.

डान्सची आवड असलेली नोरा आपल्या डान्ससोबतच फिटनेसवर देखील विशेष लक्ष केंद्रित करत असते. नुकताच तिने आपला एक हॉट व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यात ती समुद्र किनाऱ्यावर काळ्या रंगाच्या  बिकनीवर पोज देत आहे. तिचा हा लूक फारच उठून दिसत आहे आणि चाहत्यांनी देखील याला अधिक पसंती दर्शविली आहे. नोराच्या हॉट अदा आणि ग्लॅमरस अंदाज पाहण्यासाठी तिला अनेकजण इन्स्टाग्रामवर फॉलो करत असतात. त्यामुळे ती सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.  तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशलवर प्रचंड व्हायरल होत असतात.

कमी कालावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली नोरा ही रेमो डिसुझा दिग्दर्शित स्ट्रीट डान्सर ३ या चित्रपटाच्या ‘गर्मी’ गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात आली. त्यानंतर ‘ओ साकी साकी’ या गाण्यामुळे तीला मोठ्या प्रमाणावर ओळखले जाऊ लागली. आपल्या प्रत्येक गाण्यातून तिचा बोल्ड आणि सेक्सी अंदाजामुळे ती नव्याने नावारूपास येत आहे.

नोरा ही मोरोक्कन कॅनेडियन डान्सर आहे, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. सन २०१४ मध्ये तिने ‘रोर’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. त्यानंतर तिला तेलुगू चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. बाहुबली आणि किक२ या चित्रपटात देखील ती दिसली होती. सलमान खानच्या बिग बॉस या रिऍलिटी शोच्या नवव्या पर्वात आल्यानंतर तिने प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान मिळवले. ती केवळ उत्तम डान्सरच नाही तर मार्शल आर्टमध्येही काम करते. ती बऱ्याच मोठ्या जाहिरातीमध्ये देखील दिसली आहे.

काही दिवसांसाठी ती ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमात अभिनेत्री मलायका अरोराच्या जागेवर पाहुणी परीक्षक म्हणून आली होती. तिच्या येण्याने तिने आपल्या जबरदस्त डान्सने अनेकांना घायाळ केले होते. मलायका या शोमध्ये पुन्हा आल्याने नोराने त्या शो ला अलविदा केले होते.

हे देखील वाचा