Wednesday, July 3, 2024

नोरा फतेहीच्या अदा पाहून टेरेंन्स झाला फिदा, स्टेजवरच केले ‘हे’ कृत्य

टीव्ही डान्स रिएलिटी शो ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’मध्ये लहान लहान मुले त्यांच्या नृत्य कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित करताना दिसतात. त्याच वेळी, शोची जज नोरा फतेही (Nora Fatehi) देखील तिच्या डान्सने स्टेजवर धमाल करताना दिसत असते.  कधी तिच्या स्टाइलने  तर कधी डान्स मूव्ह्सने नोरा आपल्या चाहत्यांंना वेड लावताना दिसत असते. अलीकडेच नोरा फतेहीने पुन्हा एकदा तिच्या तडफदार डान्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत.  हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

कलर्स टीव्हीच्या इंस्टाग्राम हँडलवरून लेटेस्ट एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कोरियोग्राफर आणि शोचे जज टेरेन्स लुईस नोरा फतेहीला स्पर्धक वर्तिकासोबत डान्स करण्यास सांगत आहेत. नोरा टेरेन्सची मागणी नाकारू शकत नाही आणि तिने वर्तिकासोबत स्टेजवर ‘प्यार दो प्यार लो’ वर एक आकर्षक डान्स करून सगळ्यांची वाहवा मिळवली. स्पर्धकांसोबत नोराचा जबरदस्त परफॉर्मन्स आहे, ज्यामध्ये दोघेही त्यांच्या डान्स मूव्ह्सने लोकांना आश्चर्यचकित करताना दिसत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

एवढंच नाही तर स्टेजवर नाचताना नोराला पाहून टेरेन्सही थांबू शकत नाही आणि तो स्टेजवर सुंदर नोरासोबत जाऊन एकत्र नाचतो. यानंतर नीतू कपूरही स्टेजवर येते, जी शोची जज आहे. नंतर, पेस्टनजीने नोराला तिच्या हातात उचलले आणि टेरेन्सनेही तेच केले. यावेळी नोरा फतेही गुलाबी रंगाच्या साडीत नेहमीप्रमाणेच अप्रतिम दिसत होती. हा शो करण कुंद्रा होस्ट करत आहे. त्याचा नवीन भाग रविवारी रात्री 10.30 वाजता कलर्स टीव्हीवर पाहायला मिळेल.

हे देखील वाचा