Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘कॉल मी’ गाण्यावर नोराचे भन्नाट एक्सप्रेशन्स, पाहून तुम्हीही म्हणाल ‘झक्कास!’

‘कॉल मी’ गाण्यावर नोराचे भन्नाट एक्सप्रेशन्स, पाहून तुम्हीही म्हणाल ‘झक्कास!’

कोरोनाच्या काळात कलाकारांचे खूप वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे चाहत्यांचे मनोरंजन मोठ्या प्रमाणात होत आहे. सोशल मीडियावर आपल्या डान्स आणि स्टाईलने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री नोरा फतेही काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे सुंदर हावभाव आणि डान्स पाहून चाहते कायमच वेडे होत असतात. अलीकडेच नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक धमाकेदार व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये नोराची स्टाईल फारच कौतुकास्पद आहे. या व्हिडिओमध्ये ‘कॉल मी’ गाण्यावर तिचे भन्नाट एक्सप्रेशन्स दिसत आहेत. नोराची ही शैली पाहून चाहत्यांनी व्हिडिओवर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, नोराने शिमिरी गाऊन घातला आहे. यात तिच्या ड्रेसला अगदी शोभेल असे तिने कानातले घातले आहे, तर तिच्या हेयर स्टाईलमुळे ती खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, नोरा प्रथम कॉल मी गाण्यावर मस्त हावभाव देताना दिसली आहे. त्यानंतर ती एक सुंदर चाल घेऊन पुढे येताना दिसली आहे. नोरा फतेहीचे चाहते हा व्हिडिओ बघूनच वेडे झाले आहेत. या व्हिडिओला चाहत्यांसह कलाकारही खूप प्रतिक्रिया देत आहेत.

नोरा फतेही तिच्या डान्सच्या सरावाचे व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हाच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात दिसणार आहे. तिने आपल्या शैलीने लोकांची मने जिंकण्यात कधीच कोणतीही कसर सोडली नाहीये. चाहत्यांना आशा आहे की, या चित्रपटात नोराचा चांगला डान्स दिसेल.

नोरा फतेही आणि माधुरी दीक्षित यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होता, ज्यात नोराच्या ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर माधुरी दीक्षित कमालीची थिरकताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुमच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, थोडे ऑक्सिजन लोकांमध्ये वाटा’, राखी सावंतचे ‘पंगा क्वीन’ला आवाहन

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा