Friday, July 5, 2024

‘नदियों पार’ गाण्यावर जान्हवी कपूरनंतर, आता पाहायला मिळाला नोरा फतेहीचा जलवा! फिल्मफेअर सोहळ्यातील व्हिडिओ झाला व्हायरल

अलीकडेच जान्हवी कपूरने ‘रुही’ चित्रपटातील तिच्या डान्स परफॉर्मेन्सने सर्वांची मने जिंकली आहेत. ‘नदियों पार सजन दा थाणा’ या गाण्यामध्ये जान्हवीच्या अदा पाहून सर्वच चकित झाले आहेत. या गाण्यात प्रेक्षकांना तिच्या ग्लॅमरस आउटफिट सोबत बोल्ड डान्सही पाहायला मिळाला आहे. त्याचवेळी, नोरा फतेहीनेही या गाण्यावर ठुमके लावत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.

अलीकडेच, फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये नोरा शोचा होस्ट मनीष पॉलसोबत मस्त डान्स करताना दिसत आहे. हे सर्वांनाच माहित आहे की, नोरा बेली डान्समध्ये किती माहिर आहे. जेव्हा ती डान्स फॉर्ममध्ये नाचते, तेव्हा प्रत्येकजण तिला बघतच राहतो. या वेळीदेखील असेच काहीसे घडले आहे.

 

नोरा फतेहीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती ‘रुही’ चित्रपटाच्या हिट गाण्यावर बेली डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसली आहे. तसेच चाहतेही आता हा व्हिडिओ पाहून, नोराच्या या डान्सचा आनंद घेत आहेत.

फिल्मफेअर पुरस्कार नुकतेच प्रसारित झाले, ज्यामध्ये नोरानेही उत्कृष्ट परफॉर्मेन्स दिला. नोराने तिच्या हिट गाण्यांवर जोरदार डान्स केला आणि स्टेजवर बरेच स्टंटही दाखवले. नोराने स्वत: तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टेज परफॉर्मेन्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 

याशिवाय, नोराच्या परफॉर्मेन्ससोबतच तिच्या आउटफिट्सवरही बरीच चर्चा झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात नोराने स्टनिंग आऊटफिटमध्ये स्टेजवर धमाकेदार डान्स केला. माध्यमातील वृत्तानुसार, नोराचा हा ड्रेस एका प्रसिद्ध हॉलिवूड डिझायनरने डिझाइन केला आहे.

हे देखील वाचा