Saturday, July 6, 2024

धाडस असावं तर असं! सिंहिंणींनी घेरलेल्या नोराला नाही कुणाची भिती; फोटो पाहून तुम्हीही कराल प्रशंसा

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय डान्सरपैकी एक असलेली नोरा फतेही आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे ती चाहत्यांना घायाळ करत असते. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या नोराचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ही सोशल मीडियावर तिच्या नवीन फोटोची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र, यावेळी कौतुक तिच्या सौंदर्याचे होत नसून तिने या फोटोंमध्ये दाखवलेल्या धाडसाचे होत आहे.

अल्पावधीतच आपल्या डान्समुळे नोरा फतेहीने (Nora Fatehi) चित्रपटक्षेत्रात जी लोकप्रियता मिळवली आहे, ती क्वचितच कलाकारांना मिळते. म्हणूनच नोरा सध्या सिनेसृष्टीतील महत्वाची व्यक्ती मानली जाते. आपले अनेक फोटो ती चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्या घायाळ लूकवर तिचे चाहते नेहमीच फिदा होत असतात. आता नुकतेच नोराने आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती दोन सिंहिंणीच्या मध्ये बिनधास्त बसलेली दिसत आहे. तिच्या या धाडसी वृत्तीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

हेही पाहा- बाई वाड्यावर या’ बोलणाऱ्या निळू भाऊंनी लहान असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता | Nilu Fule

हे फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “आतापासून सिंहाची ऊर्जा दिसेल… तसे ते खूपच सुंदर होते.”

हे फोटो पाहून “आमची सिंहीण तरी काय कमी धाडसी आहे का?” अशीच प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहे. या आधीही नोराने एक फोटो शेअर केला होता, त्यातील तिच्या बोल्ड लूकला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली होती.

या फोटोंमध्ये नोरा एका स्विमिंग पूलच्या समोर उभी राहून मोबाईलमध्ये बघत असल्याचे दिसते. यावेळी तिने घातलेल्या काळ्या रंगाच्या बिकिनीने आणि मोकळ्या केसांमध्ये तिचे रूप खुलून दिसत आहे. यावेळी तिने कानात घातलेल्या रिंगासुद्धा तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या सुंदर फोटोसोबत नोराने “पुढच्या सुट्टीची योजना करतेय, तुम्ही येणार का?” असे मजेशीर कॅप्शनही दिले होते.

नोराच्या या फोटोवर चाहत्यांनी २० लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊसही पाडला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा