‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…


जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांचा ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात नवीन गाणे ‘कुसू कुसू’ सध्या खूप चर्चेत आहे. या गाण्यात नोरा फतेहीने पुन्हा एकदा तिचा जलवा दाखवला आहे. या गाण्यात तिने बेली डान्स करून सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत. तिच्या ‘दिलबर दिलबर’ या गाण्यानंतर आता ‘कुसू कुसू’ गाण्याने देखील सगळ्यांना वेड लावले आहे. परंतु यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे.

या गाण्याला हिट करण्यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. या गाण्याचे शूटिंग करताना नोराला दुखापत देखील झाली आहे. परंतु तरी देखील तिने शूटिंग पूर्ण केली होती. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर या गोष्टीचा खुलासा केला होता. तिने एका बीटीएस व्हिडिओमधून ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली होती. (Nora fatehi injured in shooting of kusu kusu song)

या व्हिडिओमध्ये नोराने तिच्या गळ्याला झालेल्या जखमेच्या देखील उल्लेख केला. तिने सांगितले की, या गाण्याचा शूटिंग दरम्यान तिने जड बॉडीसेट घेतला होता आणि शूटिंग दरम्यान तो गळ्यात अडकला होता. ज्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होत होता.

तिने सांगितले की, हा आतापर्यंतचा तिचा सगळ्यात वाईट अनुभव होता आणि ती ही घटना कधीच विसरू शकणार नाही. या दरम्यान तिच्या पायाला देखील लागले होते. तिने सांगितले की, तिने गाण्यात ड्रेसला मॅचिंग हाय हिल्स घातले होते. तसेच डान्स करताना तिच्या पायाला काच लागली, ज्यामुळे पायातून खूप रक्त येत होते.

त्यावेळी शूटिंग थांबवण्याऐवजी तिने पायाला पट्टी बांधली आणि शूटिंग सुरू केली. तिने खूपच मेहनतीने ही शूटिंग पूर्ण केली आहे. तिच्या जागी दुसरा कोणताही कलाकार असला असता तर त्याने ब्रेक घेतला आहे. परंतु नोराने तिचे काम पूर्ण केले आणि नंतर आराम केला. नोराने २०१५ साली ‘बिग बॉस ९’ मधून इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले. त्यानं तर तिला सर्वत्र ओळख मिळाली तिची सगळी गाणी सुपरहिट झाली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल


Latest Post

error: Content is protected !!