बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीशी (Nora Fatehi) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, ज्यावर चाहतेही खूप प्रेम व्यक्त करतात. पण आता नोरा फतेहीचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यात आले आहे, ज्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. नोरा नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असायची. इतकेच नव्हे, तर लाखो लोक तिला फॉलो करायचे. पण आता अचानक तिचे इंस्टाग्राम अकाउंट गायब झाले आहे.
नोरा फतेहीला इंस्टाग्रामवर ३७.६ दशलक्ष युजर्सनी फॉलो केले होते, त्यामुळे तिचे अकाऊंट इंस्टाग्रामच्या टॉपवर असायचे. पण आता तसे नाही. तुम्ही आता इंस्टाग्रामवर नोरा फतेहीला सर्च केल्यास तिचे पेज तिथे दिसणार नाही. आता इंस्टाग्रामवर नोरा फतेहीच्या नावापुढे क्लिक करा, तर ‘माफ करा हे पेज उपलब्ध नाही’ असे येते. यावरून नोरा फतेहीचे अकाऊंट इंस्टाग्रामवरून डिलीट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :