नोरा फतेहीने मनोरंजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट डान्सर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये देखील तिची गणना होते. नोरा अनेकदा तिच्या बोल्ड आउटफिट्समुळे चर्चेचा विषय ठरत असते. पुन्हा एकदा ती तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. नोरा पांढऱ्या कटआउट ड्रेसमध्ये बाहेर आली आणि पॅपराझीला पोझ दिली. तिचे फोटो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी तिला ट्रोल करायला सुरू केलं. नोराने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर या ड्रेसमध्ये काही व्हिडिओ देखील शेअर केले आहेत जे तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.
ड्रेसमुळे झाली ट्रोल
यावेळी नोराने पांढऱ्या रंगाचा कटआउट ड्रेस घातला होता. पॅपराझीने तिचे अनेक फोटो काढले. इंस्टाग्रामवर हे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच युजर्सने नोराला जोरदार ट्रोल केले. सोशल मीडिया युजर्सने या फोटोंवर अश्लील प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “तू जे परिधान केले आहे तेही काढून टाक.” आणखी एकाने लिहिले की, “तिला थोडे पैसे द्या जेणेकरून ती कपडे खरेदी करू शकेल.” एका युजरने लिहिले की, “मुलांना वेड केले.” त्याचवेळी, एका युजरने लिहिले की, “जर ती अफगाणिस्तानात असती, तर तिला फटके पडले असते.”
नोराने गाडीत केला डान्स
नोराने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर या ड्रेसमध्ये एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यात ती बसून डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. तिचा मित्रही तिच्यासोबत कारमध्ये दिसत आहे. तिचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.
नोरा फतेही अनेकदा पांढरे ड्रेस घालते. हा रंगही तिला अगदी खुलून दिसतो. नोरा केवळ वेस्टर्न ड्रेसमध्येच नाही, तर एथनिक वेअरमध्येही खुप सुंदर दिसते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर भारतीय पारंपारिक लूकमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत. सलवार सूटपासून साडीपर्यंत, नोरा प्रत्येक गेटअपमध्ये परिपूर्ण दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…










