असं म्हणतात की या जगात एकसारखे दिसणारे सात लोकं आहेत. मात्र अजूनही कोणी या सातही लोकांना एकत्र पाहिलेले नाही. मात्र अनेकदा आपण पाहिले असेल की कलाकारांच्या बाबतीत असे घडते. विशिष्ट कलाकरासारखा दिसणारा एखादा व्यक्ती अचानक सोशल मीडियावर येतो, व्हायरल होतो आणि त्याला प्रसिद्धी मिळते. आतापर्यंत आपण असे बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत पाहिले असेल. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमधील सर्वोत्तम डान्सर असणाऱ्या एका अभिनेत्रींच्या बाबतीत असे घडले आहे. तिच्याशी अगदी मिळता जुळता एक चेहरा जगासमोर आला आहे.
बॉलिवूडमधील अतिशय उत्तम डान्सर असणाऱ्या नोरा फतेहीच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणारा एक मुलगा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नोरा तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. तिचा डान्स आणि तिचा जलवा प्रत्येकालाच भुरळ पडताना दिसतो. बिग बॉसपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या नोराने अमाप लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या डान्सच्या जोरावर आज नोरा इंडस्ट्रीमधील काही मोजक्या उत्कृष्ट डान्सर्समध्ये गणली जाते. सध्या नोरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नोराच्या चेहऱ्याशी साम्य असलेला एक पाकिस्तानी मुलगा सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे.
नोराच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ सध्या खूपच गाजत आहे. तो मुलगा अगदी नोरा सारखा दिसत असून हा फनी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. गोरापान दिसणाऱ्या त्या मुलाच्या चेहऱ्याचा आकार अगदी नोरा सारखाच असल्याने काही क्षणांसाठी नवराच असल्याचा भास आपल्याला होतो.
नोराबद्दल अधिक सांगायचे झाल्यास तिने हिंदीच नाही तर तेलगू, तामिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. तिने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘रोर: टाइगर्स ऑफ द सुंदरबन’ या सिनेमातून केली होती. पुढे ती टेम्पर, बाहुबली आदी चित्रपटांच्या गाण्यांमध्ये डान्स करताना दिसली. २०१५ साली नोराने बिग बॉसच्या ९ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला त्यानंतर ती २०१६ साली झलक दिखला जा मध्ये देखील दिसली होती. नोरला खरी ओळख मिळाली ती सत्यमेव जयते सिनेमातील ‘दिलबर’ गाण्यांतून पुढे तिने अनेक चित्रपटांमध्ये डान्स केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
आलियासोबत लग्न करणाऱ्या रणबीरने ‘या’ अभिनेत्रींना केले आहे डेट, एक आहे साऊथमधील सुपरस्टार अभिनेत्री
बिग बॉस ओटीटी फेम गायक मिलिंद गाबाने केला साखरपुडा, व्हिडिओ आणि फोटो झाले व्हायरल