Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड ‘डर्टी लिटिल सीक्रेट’ गाण्यात नोराच्या बोल्डनेसचा तडका, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

‘डर्टी लिटिल सीक्रेट’ गाण्यात नोराच्या बोल्डनेसचा तडका, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

लोकप्रिय डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच यशस्वी होताना दिसत आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि तडफदार डान्ससाठी प्रसिद्ध असलेल्या नोराने अल्पावधीतच सिने जगतात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या डान्ससोबतच नोरा सोशल मीडियावरही चांगलीच लोकप्रिय आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकताच नोराने तिच्या आगामी नव्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. कोणते आहे नोराचे हे नवीन गाणे चला जाणून घेऊ.

बॉलीवूडची दिलबर नोरा फतेहीची लोकप्रियता प्रत्येकालाच माहित आहे. नोराने आपल्या मेहनतीमुळे हे स्थान मिळवले आहे. नोरा फतेहीच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. नोरा तिच्या डान्स आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. नोरा फतेहीच्या आगामी ‘डर्टी लिटिल सीक्रेट’ या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. नोरा फतेहीने तिच्या आगामी ‘डर्टी लिटिल सीक्रेट’ या गाण्याचा टीझर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या गाण्याच्या टीझर व्हिडिओची सुरुवात नोरा लाल डीप नेक ड्रेस घालून सोफ्यावर बसलेली दिसते, त्यानंतर व्हिडिओमध्ये जॅक नाइट दिसतो. ‘डर्टी लिटल सीक्रेट’च्या या टीझर व्हिडिओमध्ये नोरा फतेही अनेक लूकमध्ये दिसत आहे.

या गाण्याच्या व्हिडिओमध्ये नोराचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये नोरा फतेही कधी काळ्या तर कधी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे. नोरा फतेहीचा हा टीझर व्हिडिओ पाहून इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. नोरा फतेहीच्या ‘डर्टी लिटिल सीक्रेट’ या लेटेस्ट गाण्याचा व्हिडिओ काही तासांतच लाखो लोकांनी पाहिला आहे. एवढेच नाही तर या गाण्याचा व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्याही हळूहळू वाढत आहे. याशिवाय नोरा फतेही सध्या ‘डान्स दीवाने ज्युनियर’ या रिअलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.

हे देखील वाचा