Sunday, March 23, 2025
Home बॉलीवूड नोराच्या ‘जालिमा कोका कोला’ला रसिकांचा तुफान प्रतिसाद! तीनच दिवसात पार केला तीस दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा

नोराच्या ‘जालिमा कोका कोला’ला रसिकांचा तुफान प्रतिसाद! तीनच दिवसात पार केला तीस दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा

 

मागील बऱ्याच दिवसांपासून एका चित्रपटाची जोरदार सुरु आहे आणि तो सिनेमा आहे, अजय देवगण अभिनित ‘भुज.’ काही दिवसांपूर्वीच ‘भुज’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक वेडे झाले आहेत. इतका दमदार आणि देशभक्तीने परिपूर्ण असा हा ट्रेलर चांगलाच गाजत आहे. या ट्रेलरनंतर या सिनेमातील ‘जालिमा कोका कोला’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले. नोरा फतेहीचे हे गाणे सध्या चांगलेच हिट झाले आहे. या गाण्याचे विशेष बाब म्हणजे हे गाणे नोराच्या इतर गाण्यांपेक्षा खूप वेगळे आहे. या गाण्यात नोराचा संपूर्ण देसी अवतार दिसत आहे. तिच्या लुकपासून डान्सपर्यंत नोरा पूर्णपणे देशी अवतारात रंगली आहे.

हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले आहे, मात्र थोड्याच दिवसात या गाण्याला प्रेक्षकांनी खूपच प्रतिसाद दिला आहे. या गाण्याला यूट्यूबवर फक्त तीनच दिवसात तीन कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचा हा प्रतिसाद पाहून हे गाणे किती हिट होत आहे, याचा अंदाज आपल्याला येईल. या गाण्याला पाच लाखांपेक्षा अधिक लाइक्स देखील आले आहेत. या गाण्यात नोराचा हटके आणि निराळा अंदाज देखील प्रेक्षकांना चांगलाच भावताना दिसत आहे. नोराच्या फॅन फॉलोविंगमध्ये हे गाणी नक्कीच अधिक भर घालणार यात शंका नाही.

या गाण्यात नोराने निळ्या रंगाचा लेहेंगा घातला असून, पायात पैंजण, मांगटिका, कानातले घालून ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या गाण्यातील डान्सबद्दल बोलायचे झाले, तर नेहमीसारखा नोराने जबरदस्त डान्स केला आहे. नोराच्या गाण्यात नेहमी काहीतरी हटके आणि खास स्टेप्स असतात, तशा या गाण्यातही आहे. या गाण्यात ती मधेमधे बेली डान्स देखील करताना दिसते.

यूट्यूबवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. हटके शब्द आणि उडती चाल असणारे हे गाणे प्रेक्षकांच्या तोंडात सहज रुळत आहे. श्रेया घोषालने गायलेल्या या गाण्याला तनिष्क बागची यांनी लिहिले असून, वायू यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याला पाहूनच गाणे नक्की कोणी कोरिओग्राफ केले असेल याचा अंदाज सर्वाना आलाच असेल. हे गाणे गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले आहे. (nora fatehi new song zaalima coca cola released now from bhuj movie)

नोरा या सिनेमात गाण्यापुरती नसून ती या सिनेमात हिना रहमान या एका गुप्तचराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धावर बेतलेला आहे. या सिनेमात अजय देवगण, नोरा फतेहीसोबत सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त महत्वाची भूमिका निभावत असणार आहे. हा सिनेमा ११ ऑगस्टला हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा