Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘हाच आहे माझा क्रश’, व्हिडीओच्या माध्यमातून नोरा सांगितले तिच्या क्रशचे नाव

‘हाच आहे माझा क्रश’, व्हिडीओच्या माध्यमातून नोरा सांगितले तिच्या क्रशचे नाव

बॉलीवूडमधील सगळ्यात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आणि डान्सर म्हणजे नोरा फतेही. नोराने खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये तिचे नाव कमावले आहे आणि लाखोंमध्ये फॅन फॉलोवर्स देखील झाले आहे. आज प्रत्येकजन तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सवर लक्ष ठेवत असतो. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय करते याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. त्यामुळे प्रत्येकजण तिचे अनेक चाहते सोशल मीडियावर तिच्या पोस्टची वाट पाहत असतात. नुकताच नोरा फतेहीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओ मध्ये ती तीच्या क्रशबद्दल सांगताना दिसत आहे.

नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप बोल्ड आणि हॉट दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, नोरा दोन वेगवेगळ्या मूडमध्ये दिसत आहे. तिच्या व्हिडिओमधील हे गाणे ऐकून तिचे सगळे चाहते स्वतःला नाचण्यापासून थांबवू शकत नाही. या व्हिडिओमध्ये तीने सांगितले आहे की, तिचा क्रश कोण आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले आहे की, ती खूप सुंदर आहे आणि तिला हे चॅलेंज मान्य आहे.

हा व्हिडिओ शेअर करत, नोराने कॅप्शन दिले आहे की,”आधी आणि नंतर जेव्हा फिल्मफेअर माझा डान्स बघतो.” म्हणजेच नोराने फिल्मफेअर तिचा क्रश आहे असे सांगितले आहे.” नोराने फिल्म फेअर अवॉर्डमध्ये एक जबरदस्त डान्स केला होता. हा डान्स व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. तसेच आत्ता केलेला व्हिडिओ देखील प्रेक्षकांना खूप आवडला आहे आणि सगळेजण त्या वेळेवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत नाही. या व्हिडिओमध्ये नोरा केसरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

डान्सच्या बाबतीत नोराचा हात कोणीच धरू शकत नाही. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर 3’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. ती लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे.

हे देखील वाचा