Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड जाळ अन् धूर संगटच! नोरा फतेहीने आपल्या सौंदर्याने केले चाहत्यांना घायाळ; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

जाळ अन् धूर संगटच! नोरा फतेहीने आपल्या सौंदर्याने केले चाहत्यांना घायाळ; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

अभिनेत्री आणि त्यांचे फोटोशूट हा नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. वेगवेगळ्या अवतारातील आकर्षक आणि मनमोहक फोटो नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. कलाकार देखील अगदी दररोजच त्यांचे फोटोशूट करून घेत असतात. हे फोटोशूट झाल्यानंतर कलाकार काही निवडक फोटो सोशल मीडियावर देखील शेअर करतात. फोटोशूटच्या बाबतीत सर्वात पुढे असणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोराचे अगदी रोजच विविध फोटोशूट होतात, आणि ती रोज त्या शूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

नोराने नुकतेच तिचे नवीन फोटोशूट केले असून, त्यातले मोजके फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून बघणारे पुन्हा पुन्हा नोराच्या प्रेमात पडतील इतकी सुंदर दिसत आहे ती, जणू हुस्नपरीच. बेंगणी रंगाच्या बॉडीकॉन गाऊनमधे नोरा खूपच सुरेख दिसत आहे. बेंगणी रंगाचा गाऊन आणि त्याच रंगाच्या बॅकग्राउंडमध्ये नोराचे रूप अधिकच खुलून आले आहे. या फोटोंमध्ये ती कोणत्याही जलपरीपेक्षा कमी दिसत नाहीये. (nora fatehi share stylish photos in bodycon gown)

स्टायलिश गाऊन, इयरिंग्स, अंगठ्या बस एवढीच ज्वेलरी घालूनही नोरा सर्वांनाच घायाळ करत आहे. तिच्या या अवतारात तिचा कमनीय बांधा देखील खूपच छान उठून येत आहे. नोराच्या या फोटोंवर फॅन्सदेखील भरभरून कमेंट्स येत आहेत. नोराने खूपच कमी वेळात प्रचंड मेहनत आणि प्रयत्नांनी एवढे मोठे यश आणि लोकप्रियता मिळवली आहे. तिला सोशल मीडियावर ३०.७ मिलियन फॉलोवर्स असून, दिवसागणिक त्यात भरसुद्धा पडत आहे.

चित्रपटांमध्ये फक्त डान्ससाठी दिसणारी नोरा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात ती एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर आदी कलाकार देखील दिसणार आहेत.

नोराने एका डान्सरच्या रूपात या क्षेत्रात पाऊल टाकले होते. तिला सर्वात जास्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता ‘दिलबर’ या गाण्याने मिळवून दिली. त्यांनतर तिने कधीच मागे वळून न बघता एकापेक्षा एक हिट गाणी दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माधुरी दीक्षितने परिधान केला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा लेहंगा; किंमत वाचून तुम्हीही म्हणाल, ‘मार डाला’

श्रीदेवींनी अवघ्या ४ वर्षांच्या वयात ठेवले होते फिल्मी दुनियेत पाऊल; बॉलिवूडमध्ये घ्यायच्या अभिनेत्यांपेक्षाही अधिक फी

अपरा मेहतांनी आपल्या अभिनयाने जिंकली चाहत्यांची मने; तर एकाच व्यक्तीशी थाटला होता दोनदा संसार

हे देखील वाचा