‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीला लहान मुले फार आवडतात. म्हणून ती कधीही त्यांच्या इच्छा टाळत नाही. मग ती इच्छा रस्त्याच्या मध्यभागी असली तरी चालेल. सध्या नोराचा एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती लहान मुलांच्या म्हणण्यानुसार, एका रस्त्यावर तिच्या हिट गाण्यावर नाचताना दिसत आहे. खास गोष्ट अशी की, तिचे चिमुकले चाहतेही तिला डान्सच्या बाबतीत जोरदार टक्कर देताना दिसले.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, नोराभोवती बरीच लहान मुले, तिला घेरून उभी आहेत. कारण त्यांना त्यांचे डान्सचे टॅलेंट नोराला दाखवायचे आहे. नोरादेखील कसलीही हरकत न बाळगता रस्त्यावर नाचू लागते, हे पाहून लहान मुलेही खूप आनंदी होतात. या व्हिडिओमध्ये ती तिचे हिट गाणे ‘कमरिया’वर नाचत आहे. तसेच, जेव्हा ‘स्ट्रीट डान्सर’च्या शूटसाठी नोरा परदेशात गेली होती, हा व्हिडिओ तेव्हाचाच आहे.
नोराच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती मल्टीस्टारर ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त, आता वृत्त असे आहे की, नोरा टायगर श्रॉफच्या ‘गणपत’मध्येही दिसणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ती द्वितीय फिमेल लीडमध्ये दिसेल. तसेच या चित्रपटात टायगरची मुख्य अभिनेत्री असेल, क्रिती सेनन. ‘गणपत’ २०२२ म्हणजे पुढच्या वर्षी रिलीझ होईल.
डान्सिंग क्वीन बनल्यानंतर, आता नोराला अभिनयात देखील नाव कमावण्याची इच्छा आहे. ज्यासाठी ती खूप मेहनतही घेत आहे. ती ‘भुज’मध्ये सिक्रेट एजंटची भूमिका साकारणार असून, या चित्रपटात ती धमाकेदार ऍक्शन करतानाही दिसणार आहे. आत्तापर्यंत नोरा चित्रपटांमध्ये नाचताना दिसली आहे, पण आता ती अभिनयातही हात आजमावणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ