नोरा फतेहीचा ‘हा’ मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्ही देखील हसून हसून व्हाल लोटपोट


बॉलिवूड जेव्हा मधील टॉप डान्सरचे नाव घेतले जाते, तेव्हा नोरा फतेही हे नाव सर्वात वरच्या स्थानी असते. नोरा ही बॉलिवूड मधील अशी एक डान्सर आहे की, तिने खूप कमी कालावधीत तिचे नाव कमावले आहे. दिलबर दिलबर या सुपरहिट गाण्यावर डान्स करणाऱ्या नोराची एक कमालीची डान्सर म्हणून ओळखली निर्माण झाली आहे. तिचे डान्स स्टेप्स, हावभाव यामुळे ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ती तिचे वेगवेगळे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू येईल.

नोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच मजेशीर दिसत आहे. व्हिडिओमधील तिचा हा अंदाज पाहून तिचे चाहते खूप हसत आहे. तसेच तिचे हावभाव बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या मजेशीर व्हिडिओवर तिचे चाहते तिला कमेंट करत आहे. तसेच अनेकजण हसण्याची ईमोजी पोस्ट करत आहे. तिच्या या व्हिडिओमध्ये तिच्या सोबत पेड्रोजो देखील दिसत आहे.

हा मजेशीर व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की,” लॉकडाऊन को हाइप को करने के लिये, बुकिंग के लिये उपलब्ध… हॅपी संडे” तिचा हा व्हिडिओ अवघ्या काही तासांपूर्वीच शेअर केला आहे . परंतु या व्हिडिओला आतापर्यंत सहा लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना तर आवडलाच आहे सोबत अनेल कलाकारांनी देखील तिच्या या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.