बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोराने खूप कमी कालावधीत तिचे नाव कमावले आहे. अभिनयासोबत ती डान्समध्ये पारंगत आहे. तिचे अनेक डान्स व्हिडिओ प्रदर्शित झाले आहेत. तिच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः नाचण्यास प्रवृत्त केले आहे. ती सोशल मीडियावर देखील नेहमीच तिचे फोटो आणि डान्स व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने सोशल मीडियावर अत्यंत सुंदर फोटो शेअर केला आहे. तिने भारतीय वेशभूषा केली आहे. नेहमीच वेस्टर्न लूकमध्ये दिसणाऱ्या नोरला या वेशात पाहून तुम्ही नक्कीच घायाळ व्हाल. (nora fatehi’s indian look photo viral on social media )
नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने फिकट पिवळ्या रंगाचा लॉन्ग ड्रेस परिधान केला आहे. फुल स्लिव्ह्ज असणाऱ्या या ड्रेसवर घेतलेली ओढणी खूपच सुंदर दिसत आहे. तिने यावर अगदी हलकासा मेकअप केला आहे. तसेच कोणतीही ज्वेलरी परिधान केली नाही. तिने केवळ इअरिंग घातले आहेत. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “वेळ हे जीवनाचे सार आहे आणि मी शिकण्याचा प्रयत्न केला आहे, पण मला वाटते की, आता अधिक शिकण्याची गरज आहे.” तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत.
नोरा ही एक उत्कृष्ट डान्सर तसेच अभिनेत्री आहे. तिने अनेक गाण्यांमध्ये डान्स केला आहे. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर ३’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच तिचे ‘हाय गर्मी’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. ती लवकरच ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. नुकतेच तिचे झालीमा कोका कोला पिला दे हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल
-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित