आपल्या ‘हाय गर्मी’ या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणारी बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर म्हणजे नोरा फतेही होय. नोरा ही बॉलिवूडमधील एक हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाण्यांवर तिने डान्स केला आहे. नोरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे हॉट फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने तिचे काही हटके फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा नवीन लूक पाहायला मिळत आहे.
नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. नोराने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा टॉप आणि पँट परिधान केली आहे. तसेच यावर तिने एक जॅकेट घेतले आहे. पायात हाय हिल्स, गळ्यात सोनेरी चैन आणि इअरिंग घातले आहेत. एकंदरीत ती या लूकमध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे. (nora fatehi’s new look viral on social media)
तिच्या या फोटोला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नोरा तिच्या ड्रेसिंगमुळे नेहमीच चर्चेत असते. दरवेळी ती नवनवीन लूकमध्ये समोर येत असते. कधी पारंपारिक लूकने, तर कधी मॉर्डन लूकने ती चाहत्यांना वेड लावत असते.
नोरा एक उत्कृष्ट डान्सर आहे. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. त्यामुळे तिला सर्वत्र ‘दिलबर गर्ल’ या नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर 3’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरिया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे.
ती लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसली आहे. त्यांचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसेच तिचे ‘कोका कोला’ हे गाणे देखील खूप गाजले आहे. या गाण्यावरील तिच्या डान्स स्टेप्स देखील खूप व्हायरल झाल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिकिनी अन् दोन वेण्या घालून अभिनेत्री मोनालिसाने केले मालदीवमधील फोटो शेअर, पतीही दिसला शर्टलेस
-‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट
-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल