‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या शोला जुलैमध्ये १४ वर्षे पूर्ण होणार आहेत. हा शो सर्वात जास्त काळ चालणारा कॉमेडी शो आहे, ज्याची क्रेझ इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. याचे एक कारण म्हणजे, शोची संकल्पना आणि दुसरे कारण म्हणजे शोमधील मनोरंजक पात्रे. ही पात्रे जितकी जास्त हसतात, तितक्याच खोल गोष्टी सांगून विचार करायला भाग पाडतात. असेच एक पात्र बापूजींचे आहे. बापूजी वेळ आल्यावर प्रत्येकाला आपल्या सल्ल्याने समजूतदारपणाचा मार्ग दाखवतात. पण तुम्हाला माहित आहे का, की या भूमिकेसाठी अमित भट्ट (Amit Bhatt) हे निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते.
अमित भट्ट साकारतायेत बापूजींची भूमिका
अमित भट्ट सब टीव्हीच्या लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बापूजींची भूमिका साकारत आहेत. गेल्या १४ वर्षांपासून ते या शोचा एक भाग आहेत आणि त्यांना या भूमिकेतही चांगलीच पसंती देखील मिळत आहे. कधी ते लहान मुलांसारखे वागून सगळ्यांना लोटपोट करतात, तर कधी खूप समजुतदार बनतात. मात्र शोच्या सुरुवातीला ही भूमिका अमितला नाही तर अन्य कोणत्या तरी कलाकाराला ऑफर करण्यात आली होती. तो कलाकार ‘तारक मेहता शो’मध्येच काम करतोय, पण वेगळ्या भूमिकेत! होय, तो कलाकार दुसरे कोणी नसून दिलीप जोशी (Dilip Joshi) आहेत. (not amit bhatt but this was the first choice for the role of bapuji)
…नाहीतर दिलीप जोशी असते बापूजी!
एका मुलाखतीत दिलीप जोशींनीच सांगितले होते की, त्यांना पहिल्यांदा बापूजींच्या भूमिकेची ऑफर आली होती. शोचे निर्माते असित मोदी दिलीप जोशी यांना ओळखत होते. म्हणून त्यांनी त्यांना बापूजींची भूमिका ऑफर केली. परंतु दिलीप जोशी यांना वाटले की, ते या भूमिकेत पूर्णपणे बसणार नाहीत आणि म्हणून त्यांनी ती करण्यास नकार दिला. यानंतर त्यांना जेठालालची ऑफर मिळाली. त्यांना या भूमिकेबद्दलही साशंकता होती, पण तरीही त्यांनी होकार दिला. पुढे आपल्या मेहनतीने त्यांनी जेठालालचे पात्र आयकॉनिक बनवले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा