Tuesday, March 5, 2024

फक्त ‘किंग खानच’ नाही तर ‘या’ स्टार्सने देखील केलंय इंटरकास्ट मॅरेज; वाचा यादी

प्रसिद्ध दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या पत्नीने त्यांच्या सासरच्या लोकांवर धर्म परिवर्तन करून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाब टाकत असल्याचे सोशल मीडिया सांगितल्याने एकच खळबळ उडाली होती. वाजिद खान यांच्या पत्नी पारसी असून त्यांनी एका विशेष कायद्याअंतर्गत लग्न केले होते. आता मात्र वाजिद यांच्या निधनानंतर कमलरूख यांनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा इंटरकास्ट लग्नांवर वाद सुरु झाले. याच अनुषंगाने आपण पाहूया बॉलीवूड मधल्या अशाच काही जोड्या ज्यांनी इंटरकास्ट लग्न केले आहे.

शाहरुख – गौरी :
किंग खान याने १९९१ मध्ये गौरी छिब्बर सोबत प्रेमविवाह केला. शाहरुख मुस्लिम तर गौरी हिंदू आहे.
एकमेकांच्या वेगळ्या धर्मामुळे या दोघांच्या लग्नामध्ये अनेक संकटे आले. गौरीच्या घरच्यांचा या नात्याला खूप विरोध होता मात्र सरतेशेवटी गौरीच्या घरच्यांनी हे नातं मान्य केले आणि शाहरुख गौरीचे लग्न ( Intercast Marriage) झाले.

आमिर खान – किरण राव: 
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या आमिर खानने देखील दोन वेळा इंटरकास्ट लग्न केले. आमिरचे पाहिले लग्न रीना दत्ता सोबत १९८६ मध्ये झाले, मात्र १६ वर्षाच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आमिरने दुसऱ्यांदा किरण राव सोबत लग्न केले. किरण मूळची साऊथ इंडियन आहे.

सैफ अली खान-करीना:
पातोडी खानदानाचा नवाब आणि बेबो या दोघांनी २०१२ साली लग्न केले. सैफचे हे दुसरे लग्न आहे. त्याचे दोन्ही लग्न हे हिंदू धर्माच्या मुलींसोबतच झाले.

रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजा:
महाराष्ट्रीयन रितेश आणि कॅथलिक जेनेलिया यांचे लग्न २०१२ साली झाले. दोघांनी एकच चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. त्याच ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या वेळी दोघांची ओळख झाली, आणि काही वर्षांनी त्यांनी लग्न केले. आता त्यांना २ मुले आहेत.

कुणाल खेमू-सोहा अली खान:
या दोघांनी २०१५ साली लग्न केले. कुणाल हिंदू तर सोहा मुस्लिम आहे. ‘ढूंढते रह जाओगे’ या सिनेमाच्या सेटवर दोघांची प्रथम भेट झाली. आता या दोघांना इनाया नावाची मुलगी आहे. (Not only King Khan but also Ya stars have done intercast marriage)

आधिक वाचा-
‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा
‘कोई सहरी बाबू…’ गाण्यावर मुमताज आणि आशा भोसले यांनी लावले ठुमके, व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा