Monday, July 1, 2024

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू की टीटू की स्वीटी’ फेम अभिनेत्री नुसरत भरुचाची तब्येत शूटिंगदरम्यान अचानक खराब झाली. ज्यामुळे तिला मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. खरं तर अभिनेत्रीची तब्येत बऱ्याच दिवसांपासून चांगली नव्हती. असे असूनही ती सतत शूटिंग करत होती. दरम्यान, तिची प्रकृती अचानक इतकी खालावली, की तिला मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ती घरी विश्रांती घेत आहे.

शेड्यूल होते २३-२४ दिवसांचे शूटिंग
नुसरत भरूचा या दिवसात लव रंजनच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. तिने २३-२४ दिवसांचे शूटिंग शेड्यूल देखील पूर्ण केले होते. नुसरतला याबद्दल कोणालाही सांगायचे नव्हते. लव रंजनने स्वतः या चित्रपटाची घोषणा करावी अशी तिची इच्छा होती. मात्र तिच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले. (nushrat bharucha rushed to hospital from the set of luv ranjan film after vertigo attack)

अभिनेत्रीला आला होता अटॅक
नुसरत भरूचाने एका मीडिया चॅनलशी केलेल्या संभाषणात म्हटले की, “डॉक्टरांनी सांगितले आहे की, हा व्हर्टिगो अटॅक होता. हे जास्त ताणामुळे होऊ शकते. जास्त तनावामुळे मला चक्कर आली. कोरोना महामारीने लोकांना केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही तोडले आहे. मला वाटले मी एक -दोन दिवसात ठीक होईल. पण माझी तब्येत अधिकच बिघडली. यानंतर मला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मी तिथे पोहचेपर्यंत माझी तब्येत आणखी बिघडली होती. माझा रक्तदाब एकदम कमी झाला. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचले तेव्हा माझा रक्तदाब ६५/५५ पर्यंत पोहोचला होता. माझे आई-वडील रुग्णालयात पोहोचले होते. ६-७ दिवसांनंतर आता मी घरी औषध घेत आहे आणि पहिल्यापेक्षा ठीक आहे. मी ७ दिवसांची सुट्टी घेतली आहे आणि डॉक्टरांनी सांगितले की मी १५ दिवस विश्रांती घ्यायला हवी.”

चाहत्यांनी केली प्रार्थना
ही बातमी ऐकून तिचे चाहते थोडे अस्वस्थ झाले आणि ते अभिनेत्रीच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. नुसरत भरुचाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘छोरी’, ‘हुडदंग’ आणि ‘जनहित में जारी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा