Wednesday, June 26, 2024

नुसरत बरूचाच्या आगामी ‘छोरी’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

चित्रपटगृह उघडले आणि चित्रपटांच्या प्रदर्शनासह विविध नवीन आणि आगामी चित्रपटांचे टिझर आणि ट्रेलर प्रदर्शित होण्याचा सपाटा लागला आहे. लवकरच अभिनेत्री नुसरत बरूचाचा ‘छोरी’ नावाचा हॉरर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच नुसरतने तिच्या या चित्रपटाची घोषणा करत सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते. आता या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. नुसरतने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा टिझर शेअर केला आहे.

जसे या चित्रपटाचे पाहिले पोस्टर प्रदर्शित झाले तसा हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचा विषय बनला होता. आता या तिझेरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. ‘छोरी’ सिनेमाच्या या टीझरमध्ये नुसरत प्रेग्नेंट दिसत आहे. मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती आणि प्रश्न स्पष्ट या टीझरमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये नुसरत शेतात उभी दिसत असून, खूपच घाबरलेली आहे. या पोस्टरमध्ये सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे नुसरत तलावाजवळ उभी आहे, आणि तिची पाण्यात सावली तर दिसते सोबतच अजून तीन लहान मुलांची सावली पाण्यात दिसते.

‘छोरी’ सिनेमाच्या टीझरमध्ये दिसते की, नुसरत तिचे घर सोडून पळत आहे. टीझरच्या सुरुवातीला तिच्यासोबत दिसणारा तिच्या नवरा नंतर टीझरमध्ये दिसतच नाही. नुसरत कोणालातरी घाबरून तिच्या घरातून पळून जाते. तिचा कोणीतरी पाठलाग देखील करते. ती अशा एका गावात आहे, जिथे कोणच राहत नाही. हा सिनेमा महारथी ‘लपाछपी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे.

हा टिझर शेअर करताना नुसरतने कॅप्शनमध्ये लिहिले, “भयानक स्वप्न खरे होतील ‘छोरी’ येत आहे. असे नका म्हणू की, आम्ही तुम्हाला चेतावनी दिली नाही. छोरी सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा २६ नोव्हेंबर रोजी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.” ‘छोरी’ हा नुसरतच पहिलाच हॉरर सिनेमा असून, यात नुसरतसोबत मीता वशिष्ठ, राजेश जायस, सौरभ गोयल, यानिया भारद्वाज आदी अनेक कलाकार दिसणार आहेत. याशिवाय नुसरत लवकरच अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’ सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा