नुसरत भरुचाच्या आगामी ‘छोरी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांसमोर आला असून, खुद्द नुसरतने हा टीझर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणारा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. ‘छोरी’चा टीझर प्रेक्षकांना खूप आवडला असून, सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित हा चित्रपट २६ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.
नुसरत भरुचा तिच्या पहिल्या लूकमध्ये गर्भवती दिसत आहे, परंतु तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे आणि ती जंगलात किंवा शेतात मोठ्या गवताच्या मध्ये उभी आहे आणि खूप घाबरलेली आहे. या पोस्टरमध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे, ती एका तलावासमोर उभी आहे आणि तलावात तिच्या सावलीसोबत आणखी तीन मुलांच्या सावल्या दिसत आहेत. हा एक हॉरर चित्रपट आहे आणि नुसरत तिच्या या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. (nushrratt bharuccha upcoming film chhorii teaser out viral on social media)
‘छोरी’च्या टीझरबद्दल बोलायचे झाले, तर नुसरत घरातून पळून जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. कोणाच्या तरी भीतीने ती तिचे घर सोडते आणि अशी जागा शोधत असते जिथे ती व्यक्ती तिच्या मागे जाऊ शकत नाही. पण नुसरत एका गावात पोहोचते जे पूर्णपणे निर्जन आहे आणि तिथे भुताचे सावट आहे. तिथे तिला अनेक लोक दिसतात आणि त्या लोकांचे वागणे तिला थोडे विचित्र वाटते.
नुसरतशिवाय या चित्रपटात मीता वशिष्ठ, राजेश जैस, सौरभ गोयल या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशाल फुरिया दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज, विक्रम मल्होत्रा आणि जॅक डेव्हिस यांनी केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-