Friday, December 8, 2023

इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरुप परतली मायदेशी; म्हणाली, ‘मला थोडा वेळ…’

इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरुप परतली मायदेशी पॅलेस्टाईन कट्टरवादी गट हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरुप भारतात परतली आहे. रविवारी संध्याकाळी तिने मुंबई विमानतळावर आगमन केले. नुसरत भरुचा ही हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इस्रायलला गेली होती. मात्र, शनिवारी अचानक हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्याने ती तिथेच अडकली. तिच्या टीमने शनिवारी दुपारी 12.30ला तिच्याशी शेवटचा संपर्क केला होता. तेव्हा ती बेसमेंटमध्ये सुरक्षित होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे इस्रायलने तिला बाहेर पडण्यास परवानगी दिली. रविवारी सकाळी तिला विमानाने इस्त्रायलमधून बाहेर काढण्यात आले. ती दुपारी मुंबई विमानतळावर दाखल झाली. सध्या सोशल मीडियावर नुसरत भरुचा (Nusrat Bharu)अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नुसरत भरुचा मायदेशी परताच तिची मुलाखत घेण्यासाठी अनेक चॅनेलने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. या दरम्यानचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावक व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

 व्हायरल व्हिडिओमध्ये नुसरत भरुचा प्रचंड ताणावाखाली आणि थकलेली दिसत आहे या व्हिडीओमध्ये नुसरत सुखरुप परतल्याचे दिसत आले आहे. ती यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. “मला थोडा वेळ द्या,” असं मीडियाला सांगताने सांगितले आहे. हा व्हिडिओ ‘फिल्मी ग्यान’ या एंटरटेन्मेंट मीडियाच्या इन्स्टाग्रामवर पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

नुसरत भरुचा शेवटची 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अकेली’ चित्रपटात दिसली होती. चित्रपटाच्या कथेत एक भारतीय मुलगी इराकच्या गृहयुद्धात अडकल्याचे दाखवण्यात आले होते. अनेक मुली युद्धात अडकल्या असल्या तरी नुसरत भरुचाचे पात्र ज्योती युद्धग्रस्त भागातून एकटी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि संघर्ष करते. नुसरत भरुचा यांचीही सध्याची परिस्थिती तशीच झाली होती. (Nusrat Bharu stuck in Israel arrived safely in India)

आधिक वाचा-
क्रिती सेननच्या बोल्ड लूकने वाढवले ​​इंटरनेटचे तापमान
‘खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते’, राणादाच्या लूकनं वेधलं चाहत्यांचे लक्ष

हे देखील वाचा