Saturday, November 23, 2024
Home बॉलीवूड नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी केले लग्न? सोशल मीडिया पोस्टवरून नेटकरी लावताय अंदाज

नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी केले लग्न? सोशल मीडिया पोस्टवरून नेटकरी लावताय अंदाज

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी त्यांचा जवळचा मित्र असणाऱ्या अभिनेता यश दासगुप्ताचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही फोटो तयांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. मात्र या फोटोंमुळे आता वेगळ्याच चर्चाना उधाण आले आहे. ह्या चर्चा म्हणजे नुसरत आणि यश यांच्या लग्नाच्या.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ त्यांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल सतत चर्चा असतात. मध्यंतरी त्या पती निखिल जैनसोबतच्या वादामुळे आणि त्यांच्या नात्यामुळे प्रकाशझोतात आल्या होत्या. नुसरत आणि निखिल यांच्या वादांना यशला जबाबदार ठरवले गेले. नुसरत आणि निखिल विवाहित असूनही ती यशसोबत नात्यात असल्याचे सांगितले गेले.

१० ऑक्टोंबर रोजी अभिनेता यश दासगुप्ताचा वाढदिवस होता. यावेळी नुसरत यांनी मोठा केक आणला होता. केक खूपच सुंदर होता, मात्र या केकचे कौतुक होण्यापेक्षा केकवर लिहिलेल्या मेसेजच्या जास्त चर्चा होत आहे. या केकवर यश दासगुप्ताच नाव Y D लिहिले तर सोबतच त्या केकच्या खालच्या बाजूला लिहिलेल्या ओळी सगळ्यांच लक्ष वेधून घेत होत्या. त्यावर एक प्रेमी युगुल बेचवर बसल्याच दिसून येत होत, ज्यावर ‘Husband’ अस लिहले होते. त्या खालच्या थरावर एका लहान मुलासोबत एक व्यक्ति दिसत होती ज्याच्या समोर ‘Dad’ अस लिहिलेले दिसले.

इतकेच नव्हे तर नुसरतने सोशल मीडियावर यश दासगुप्ता सोबतचा फोटो पोस्ट केला आहे ज्यावर ‘Happy Birthday My Love’ असा मजकूर ही लिहिला. या फोटोमध्ये दोघेही डिनर करताना दिसून येत आहेत. यासर्व नूसरत आणि यशने लग्न केल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. याआधी नुसरतने तिच्या मुलाच्या जन्म दाखल्यावर वडिलांच्या नावासमोर यशचे नाव लिहिले होत.

दरम्यान अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बर्‍याच चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी पती निखिल जैन पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्या म्हणाली की, “निखिल आणि माझा विवाह तुर्की कायद्यानुसार झाला आहे, ज्याला भारतात मान्यता नाही. त्यामुळे निखिल पासून घटस्फोट घेण्याची काही गरज नाही अस म्हणत आम्ही मागच्या वर्षीच वेगळे झाल्याचेही त्यांनी सांगितले. तेव्हापासूनच नुसरत आणि यशच्या संबंधाची चर्चा सुरू झाली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा