Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड बाळाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच पब्लिक इव्हेंटमध्ये दिसली नुसरत जहाँ, मुलाच्या बापाबद्दल म्हणाली…

बाळाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच पब्लिक इव्हेंटमध्ये दिसली नुसरत जहाँ, मुलाच्या बापाबद्दल म्हणाली…

कलाकारांच्या आयुष्यात अभिनय आणि विवाह या दोन अशा गोष्टी आहेत ज्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती ठेवणे फार आवडते. अशात मागील काही दिवसांपासून अभिनेत्री नुसरत जहाँ तिच्या राजकीय, अभिनय आणि खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच तिने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर काहींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला, तर काहींनी तिला ट्रोल करत बाळाचे वडील कोण असे विचारले. आता अभिनेत्रीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नुसरत जहाँ ही एक अभिनेत्री असून तिने ‘तृणमूल काँग्रेस’मध्ये प्रवेश केलेला आहे. सध्या ती लोकसभेमध्ये खासदार देखील आहे. नुकतीच ती एका सार्वजनिक समारंभामध्ये उपस्थित राहिली होती. त्यावेळी तिला पत्रकारांनी घेरले आणि तिच्या बाळाबद्दल प्रश्न विचारले. पत्रकारांनी तिला विचारले की, “बाळाचा फोटो केव्हा शेअर करणार?” यावर नुसरत उत्तर देत म्हणाली, “हा प्रश्न तुम्ही त्याच्या वडिलांना विचारला पाहिजे. त्याचे वडील त्याला कुणालाच पाहून देत नाहीत.”

यावर त्याचे वडील कोण आहेत, असे विचारण्यात आले. यावर ती म्हणाली की, “बाळाच्या वडिलांना माहित आहे की, ते त्याचे वडील आहेत. आम्हाला दोघांनाही त्याला सांभाळण्यात आनंद मिळत आहे. मी यश बरोबर खूप छान आयुष्य जगत आहे.”

नुसरतला २६ ऑगस्ट रोजी दवाखान्यात भरती केले होते. त्यानंतर तिने २८ ऑगस्टला बाळाला जन्म दिला. तिने आपल्या मुलाचे नाव ईशान ठेवले आहे. ती दवाखान्यात असताना तिच्याजवळ यश उपस्थित होता. तसेच ती आई झाल्याची बातमी त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. नुसरतनेच त्याला दवाखान्यात ठेवण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली असल्याचे माध्यमांमध्ये सांगण्यात आले.

बाळाच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा पहिला पती निखिल जैनने देखील सोशल मीडियामार्फत बाळाला आशीर्वाद दिला होता. त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “आमच्या दोघांमध्ये वाद असले, तरी बाळाला आशीर्वाद देण्यासाठी मला कोणी नाही रोखू शकत. बाळ सदृढ आणि निरोगी राहावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तसेच त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो.”

अभिनेत्रीने पत्रकारांशी बोलताना, ती एकदाही बाळाचे वडील यश आहे, असे म्हणाली नाही. त्यामुळे अद्याप तिच्या चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे तिचे चाहते अजूनही संभ्रमात आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

हे देखील वाचा