Monday, July 1, 2024

न्यासा देवगनने केले आई काजोलच्या गाण्यांवर अफलातून नृत्य; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल कमाल!

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगन लवकरच 18 वर्षांची होणार आहे. न्यासा येत्या 20 एप्रिलला तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. एक स्टार किड असल्याकारणाने न्यासाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणातच सर्वत्र व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिची आई काजोलच्या वेग वेगळ्या गाण्यांवर नृत्य करताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सुरवातीला काजोलच्या ‘बोले चुडिया’, ‘सजदा’ आणि ‘तेरे नैना’ या गाण्यावर ती तिच्या ग्रुप सोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या शेवटी न्यासा करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या ‘नगडा संग’ या गाण्यावर ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावरील सगळेजण अजय देवगनच्या मुलीचा हा डान्स पाहून खूपच प्रभावित झाले आहेत, आणि सगळेजण तिचे भरभरून कौतुक करताना दिसत आहे.

न्यासा ही एक स्टार किड असूनही ती चित्रपट सृष्टीपासून खूप लांब आहे. ती अगदी क्वचित प्रसंगीच तिच्या आई-वडिलांसोबत दिसते. ती चित्रपट सृष्टीपासून खूपच लांब आहे तरी देखील काजोल अनेक वेळा तिचे फोटो सोशल मीडियावर सगळ्यांसोबत शेअर करत असते. जे फोटो क्षणार्धात वायरल होताना दिसतात. त्यामुळे सध्या न्यासाच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली आहे. त्यात तिच्या या नवीन व्हिडिओने तर सगळ्यांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. काजोलच्या या सुपरहिट गाण्यावर न्यासाचा डान्स बघून सगळेजण तिचे कौतुक करत आहे. अजय देवगन याला त्याची मुलगी न्यासा आणि मुलगा युग यांच्याबाबत खूप हळवा आहे. याची माहिती त्याने अनेक वेळा त्याच्या सोशल मीडिया पोस्ट वरून दिली आहे.

हे देखील वाचा