बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स नेहमीच चर्चेचा विषय असतात. अशातच आजकाल सगळ्यात जास्त चर्चेत आहे ती म्हणजे स्टारकिड ‘न्यासा देवगण‘. अजय देवगण आणि काजोलची लेक न्यासा देवगण तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि बेस्ट फ्रेंड ओरहान अवतारमणीमुळे कायमच चर्चेत असते. अलीकडेच न्यासाने ओरीसोबत न्यू इयर पार्टी सेलिब्रेट केली. ओरी आणि न्यासाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये न्यासा डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. ओरीसोबतचा तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
नेहमीच मुलींनी घेरलेला ओरी (orhan awatramani) सोशल मीडियावर चांगलेच वर्चस्व गाजवताे. ओरी इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधताे. अशातच आरीने न्यू इयर पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये न्यासाची आणि ओरीची फुल ऑन मस्ती दिसत आहे. अशा परिस्थितीत ओरी आणि न्यासा यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
View this post on Instagram
काही काळापासून ओरी आणि न्यासा सतत एकत्र दिसत आहेत. प्रत्येक पार्टीत न्यासा आणि ओरीची धमाल पाहून लोकांना असे वाटत आहे की, ओरी जान्हवी कपूरपासून दूर गेला आहे.
View this post on Instagram
ओरीने इन्स्टाग्राम स्टोरीवर न्यू इयर सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये न्यासा काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. या डीप नेक ड्रेसमध्ये तिचा लूक खूपच बोल्ड दिसत आहे. तसेच ते ओरीला मिठी मारत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(nysa devgan and orhan awatramani get cozy in new year party deeep neck dress photos going viral)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ठरलं तर! ‘या’ दरम्यान पार पडणार 21वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव140 सिनेमांचा समावेश
ब्रेकिंग! दिग्गज गायिका सुमित्रा सेन काळाच्या पडद्याआड